शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अन्य दोन मुलींच्याही लग्नाचा होता घाट?

By admin | Updated: May 8, 2017 04:57 IST

माहीममध्ये गरिबीला कंटाळून १३ वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिल्याच्या घटनेने सर्वांनाच हेलावून सोडले. या मुलीपाठोपाठ तिची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माहीममध्ये गरिबीला कंटाळून १३ वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिल्याच्या घटनेने सर्वांनाच हेलावून सोडले. या मुलीपाठोपाठ तिची आई अन्य दोन बहिणींच्याही लग्नाचा घाट घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी माहीम पोलीस अधिक तपास करत आहेत.माहीम येथील नयानगर परिसरात १३ वर्षांची नेहा आई आणि दोन बहिणीसोबत राहते. नेहा घरात मोठी आहे. अन्य दोन बहिणी तिच्यापेक्षा लहान आहेत. परिस्थितीमुळे नेहाचे ४० वर्षांच्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत आईने बळजबरीने विवाह लावून दिला. नेहाने पतीच्या शारीरिक अत्याचाराला कंटाळून घर सोडले आणि शुक्रवारी रात्री पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यात तिच्या चौकशीत नेहापाठोपाठ तिच्या अन्य दोन बहिणींचे तिची आई लग्न जुळवून देणार होती, अशी माहिती समोर येत आहे. परिस्थितीमुळे तीन मुलींचा सांभाळ करणे, तिला शक्य होत नव्हते. यातूनच तिने हा निर्णय घेतल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती माहीम पोलिसांनी दिली. बालविवाह, पॉक्सो, लैंगिक अत्याचार, मारहाणीच्या गुन्ह्यांत ३५ वर्षांच्या आईसह पती आसीफ आयुब खान (३८) आणि लग्न लावून देणारा अहमद राजम मोहम्मद शेख (३८) या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. ८ मेपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या तिघांकडेही पोलीस कसून चौकशी करत आहेत. सोमवारी त्यांच्या वाढीव कोठडीसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.