शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ परिसंवादाचे आयोजन

By admin | Updated: April 26, 2017 13:00 IST

 ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 26 - ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक ...

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 26 - ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबत जागृती करण्यात येत आहे. 
 
यानिमित्तानं  नागपुरातील वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे बुधवारी सकाळी तज्ज्ञ डॉक्टरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अंबानी, प्रसिद्ध सिने अभिनेता इमरान हाश्मी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे सहकार्य मिळाले आहे.
 
या उपक्रमाद्वारे पथनाट्य, परिसंवाद, डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात नाशिक येथून झाली असून, नागपुरात त्याची सांगता होणार आहे.
(प्रभावी उपचारपध्दतीने कॅन्सर होईल कॅन्सल : परिसंवाद)
 
‘लोकमत’ आणि कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
(पथनाट्यातून दिला ‘कॅन्सरला कॅन्सल करा’चा संदेश)
 
‘कॅन्सरला कॅन्सल करा’ 
या माध्यमातून पथनाट्य, सखी मंचचे कार्यक्रम, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि डॉक्टरांना प्रशिक्षण, अशा विविध कार्यक्रमांद्वारे राज्यभरात कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ९३२२१४४४४४ या क्रमांकावर मिस कॉल द्या किंवा लॉग आॅन करा ‘डब्ल्यूडब्ल्यू डॉट एकजीवनस्वस्थजीवन डॉट ईन’वर.
देशात कर्करोग हा सर्वात घातक आजार ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी भारतात सुमारे १० लाख लोकांना कर्करोगाचे निदान होते. २०३५ पर्यंत ही आकडेवारी १७ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. तरीही या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही भरपूर अज्ञान आहे. त्यामुळे बहुतेकदा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर येईपर्यंत कर्करोगाचे निदान होत नाही आणि या टप्प्यावर त्यावर उपचार करणे अतिशय कठीण होऊन जाते. वस्तुत: लवकर निदान झाल्यास, हा आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यासाठी या रोगाबद्दल जागरूकता असणे महत्त्वाचे ठरते.
 
-परिसंवादात सहभागी तज्ज्ञ डॉक्टर्स
: नागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल
: कोकिळाबेन रुग्णालयाचे कन्सलटंट ब्रेस्ट अ‍ॅण्ड कोलोरॅक्टल आॅन्कॉलॉजी विशेषज्ञ डॉ. मंदार नाडकर्णी
: कोकिळाबेन रुग्णालयाच्या आॅन्कॉलॉजीचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री.
: कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा
: आयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत
: स्नेहांचल पॅलिअ‍ॅटीव्ह केअर सेंटरच्या अध्यक्ष डॉ. रोहिणी पाटील
: सायको आॅन्कॉलॉजिस्ट एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरच्या डॉ. सुचित्रा मेहता
: राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा
 

https://www.dailymotion.com/video/x844w62