शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अवयवदान होणार अधिक सुलभ, अ‍ॅप आणि संकेतस्थळाद्वारे नोंदणी करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:08 IST

बऱ्याचदा अवयवदान कसे करावे ? किंवा कोणत्याही अवयवाची गरज भासल्यास त्याविषयी कुठे नोंदणी करावी, त्याची प्रक्रिया काय? याविषयी अजून समाजातील सर्व घटकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होण्यासाठी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (झोनल ट्रान्सप्लांट कोआॅर्डिनेशन कमिटी)ने नवे संकेतस्थळ आणि अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे.

मुंबई : बऱ्याचदा अवयवदान कसे करावे ? किंवा कोणत्याही अवयवाची गरज भासल्यास त्याविषयी कुठे नोंदणी करावी, त्याची प्रक्रिया काय? याविषयी अजून समाजातील सर्व घटकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होण्यासाठी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (झोनल ट्रान्सप्लांट कोआॅर्डिनेशन कमिटी)ने नवे संकेतस्थळ आणि अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. या माध्यमातून किचकट असलेली प्रत्यारोपण नोंदणीची प्रक्रिया आता सहज सोपी होणार आहे.अवयवांची गरज असणाºयांना तातडीने अवयव उपलब्ध व्हावेत. अवयवांच्या नोंदणीत अधिक वेळ खर्च होऊ नये म्हणून अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून घर बसल्या गरजूंना अवयवांसाठी नोंदणी करता येणार आहे. अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रूग्णांना आता प्रत्यक्ष ‘झोनल ट्रान्स्प्लान्ट कोआॅर्डिनेशन कमिटी’मध्ये जाऊन नाव नोंदणी करावी लागणार नाही. कारण आता मोबाईलच्या सहाय्याने रूग्णाची थेट झेडटीसीसीमध्ये नोंद होणे शक्य आहे.शनिवारी ‘झोनल ट्रान्स्प्लान्ट कोआॅर्डिनेशन कमिटी’च्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अ‍ॅप व अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. शिवाय या कार्यक्रमात अवयवदान करणाºया मुंबईसह राज्यभरातील जवळपास ३४ अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. झेडटीसीसीमध्ये नावनोंदणी करणाºया रुग्णांना नोंदणी कशी करायची, कुठे जायचे याची माहिती नसते. शिवाय नावनोंदणीसाठी फॉर्म भरताना अनेक कागदपत्र सादर करावी लागतात. ही प्रक्रिया खूप मोठी असते. अशा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ही प्रक्रिया सोयीस्कर करून देण्यासाठीची सर्व माहिती या अ‍ॅपमध्ये समाविष्ट आहे. या अ‍ॅपद्वारे रुग्णांना घरी बसल्या फॉर्म भरून देता येणारे आहे. इतकंच नाहीतर सर्व कागदपत्रेही आॅनलाइन जमा करण्याची सुविधा आहे.यासंदर्भात मूत्रपिंडतज्ज्ञ डॉ. भरत शहा यांनी सांगितलं की, ‘सध्याची अवयव नोंदणीची प्रक्रिया खूप मोठी असल्याने ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपवर नोंद झाल्यानंतर एखादा मेंदूमृत रुग्ण असल्यास रुग्णालयातील डॉक्टर तातडीने या अ‍ॅपवर याची माहिती देतील. या अ‍ॅपवर रुग्णांचा मोबाईल क्रमांकही असेल. झेड़टीसीसी आणि रोटोच्या सल्लागार समितीच्या सदस्य डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले की, ‘अवयवांची गरज असणाºयांना नावनोंदणी करण्यासाठी रुग्णालयात जावे लागत होते. पण आता घरबसल्या नावनोंदणी करणे शक्य आहे. यामुळे त्रास कमी होण्यास मदत मिळणार आहे.सध्याच्या बदलत्या जीवनात माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अवयवदानाची ही प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी झेडटीसीसीने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. यामुळे अवयवांची प्रतिक्षायादी शून्यावर आणण्यास नक्कीच मदत होईल- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री 

टॅग्स :Organ donationअवयव दानMaharashtraमहाराष्ट्र