शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लुटारु ठेकेदारांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 23, 2016 03:11 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ठेकेदारांकडून मागील पाच वर्षांत बोगस कर्मचारी दाखवून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांची लूट केल्याप्रकरणी सखोल चौकशी

वसई/पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ठेकेदारांकडून मागील पाच वर्षांत बोगस कर्मचारी दाखवून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांची लूट केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून शासनास चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी पालघर यांना दिले असल्याची माहिती गुरुवारी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तरात दिली.महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग समित्यांसाठी २२ ठेकेदारांकडून मागील ५ वर्षांच्या कालावधीत बोगस कर्मचारी दाखवून महानगरपालिकेची सुमारे २०० ते २५० कोटीची लूट करण्यात आली. या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी अशा ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली होती. तसेच विविध कामांमध्ये ठेकेदारांकडून होत असलेल्या अनियमिततेबाबत व गैरकारभाराबाबत स्थायी समितीच्या बैठकीस गावडे यांनी हा विषय उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आयुक्त सतीश लोखंडे यांनी आकृतीबंधापेक्षा अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु, मागील ५ वर्षात ज्या ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे कोट्यवधीची लूट केली त्यांच्याकडून पैसे वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पुढे काय कारवाई होणार, असा प्रश्न गावड ेयांनी उपस्थित केला होता. (वार्ताहर) >तब्बल पाच वर्षे चालली बोगसगिरीयुनिव्हर्सल एंटरप्रायजेस, क्लासिक एंटरप्रायजेस, दिव्या एंटरप्रायजेस, आकाश एंटरप्रायजेस, गजानन एंटरप्रायजेस, ओम साई एंटरप्रायजेस, मधुरा एंटरप्रायजेस व अथर्व एंटरप्रायजेस इत्यादी ठेकेदारांचा यामध्ये सहभाग असून या व अशा अनेक ठेकेदारांकडून ५ वर्षांत बोगस कर्मचारी दाखवून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली. हे प्रकरण मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात या भ्रष्टाचाराचे पडसाद उमटले. >अहवालाची डेडलाइन ठरली : विधान परिषद सदस्यांनी या प्रकरणाबाबत तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित करून दोषी ठेकेदारांकडून पैसे वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून चार महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.