शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा आदेश चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 01:22 IST

एखाद्या अपवादात्मक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचे आदेश दिले आहेत. हा आदेश सर्व प्रकरणांमध्ये लागू होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने

- अ‍ॅड. वर्षा देशपांडेएखाद्या अपवादात्मक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचे आदेश दिले आहेत. हा आदेश सर्व प्रकरणांमध्ये लागू होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या आदेशामुळे भविष्यात गर्भलिंगनिदान होण्याचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती आहे. गरोदरपणात साधारणत: १२ किंवा १८व्या आठवड्यात गर्भाची अवस्था कळते, त्यातून त्याचे शारीरिक स्वास्थ्य कसे असते, याविषयी निदान होते. केवळ काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये गर्भाला व्यंग असल्याचे उशिराने समजते. मात्र, अशा अपवादात्मक प्रकरणांसाठी आता मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली पाहिजेत. जेणेकरून, ही प्रक्रिया गुंतागुंतीची न राहता जलदगतीने होईल. २०व्या आठवड्यात महिलेचा गर्भ परिपक्व होण्याच्या मार्गावर असतो. अशा स्थितीत गर्भपात करणे हे हत्या करण्यासाखेच आहे. भविष्यात अशा प्रकरणांसाठी विशेष न्यायालयीन समितीची नेमणूक करणे आवश्यक आहे. गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या प्रकरणांमधील बारकावे तपासण्यासाठी त्याचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी ही समिती सक्षम असली पाहिजे. जेणेकरून, त्या महिलेला न्यायालयीन प्रक्रियेच्या दिरंगाईचा फटका बसणार नाही, याची दक्षता घेता येईल. विशेष समितीत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश कटाक्षाने टाळला पाहिजे. कारण गेल्या काही वर्षांतील वैद्यकीय तज्ज्ञांमधील पारदर्शीपणा कमी होत चालल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या विशेष समितीत वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश केल्यास, त्या माध्यमातून गर्भलिंगनिदान चाचण्या करून स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (लेखिका या ‘लेक लाडकी’ अभियानाच्या प्रमुख आहेत)