शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अवमान करणाऱ्याला हजर होण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:15 IST

सोशल मीडियावर न्यायालयांबाबत अवमानजनक मजकूर लिहिणाऱ्या आय. के. चुगानी यांना १४ आॅगस्ट रोजी स्वत: किंवा वकिलामार्फत उपस्थित होण्याचा आदेश

- लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर न्यायालयांबाबत अवमानजनक मजकूर लिहिणाऱ्या आय. के. चुगानी यांना १४ आॅगस्ट रोजी स्वत: किंवा वकिलामार्फत उपस्थित होण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिला. चुगानी हे मुंबई येथील रहिवासी आहेत.चुगानी यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून बिनशर्त क्षमा मागितली आहे. तसेच, हे प्रकरण मुंबई येथे स्थानांतरित करण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना अर्ज दिल्याचे कळविले आहे. उच्च न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणीदरम्यान या पत्राचा लिफाफा न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांच्याकडून सर्वांसमक्ष उघडून घेतला. अ‍ॅड. भांडारकर यांनी पत्र वाचून चुगानी यांचे म्हणणे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने प्रबंधक कार्यालयाला या पत्राच्या खरेपणाची शहानिशा करण्यास सांगून चुगानी यांना वरीलप्रमाणे आदेश दिला.काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाने फेसबुक पेज सुरू करण्यात आले होते. त्यावर न्यायालयाविषयी अतिशय आक्षेपार्ह भाषेत पोस्ट टाकल्या जात होत्या. या पेजमुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का बसत होता. ही बाब निदर्शनास येईपर्यंत सुमारे तीन लाख फेसबुक युजर्सनी या पेजला भेट दिली होती. परिणामी न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत चुगानी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने अन्य प्रतिवादी फेसबुक, टिष्ट्वटर, यूट्यूब व गुगल यांना यावर पुढच्या तारखेपर्यंत उत्तर मागितले आहे.