शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
2
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
3
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
4
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
5
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
6
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
7
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
8
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
9
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
10
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
11
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
12
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
13
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
14
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
15
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
16
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
17
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
19
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
20
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार

निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

By आप्पासाहेब पाटील | Updated: October 15, 2025 16:09 IST

Devendra Fadnavis News: कोणत्या विषयाची तक्रार कोणाकडे हे माहिती नाही, कायदा काय आहे हे माहिती नाही, कोणत्या निवडणुका कोणत्या निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली चालतात हेही माहिती नसलेले विरोधक मागील दोन दिवसापासून मतदारयाद्याबाबत शंका उपस्थित करणारे विरोध म्हणजे  'फियास्को' आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या मुद्द्यांवर बोट ठेवत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र समाधान कारक उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा विरोधकांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मात्र कोणत्या विषयाची तक्रार कोणाकडे हे माहिती नाही, कायदा काय आहे हे माहिती नाही, कोणत्या निवडणुका कोणत्या निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली चालतात हेही माहिती नसलेले विरोधक मागील दोन दिवसापासून मतदारयाद्याबाबत शंका उपस्थित करणारे विरोध म्हणजे  'फियास्को' आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, इतके कन्फुजक विरोधक माझ्या जीवनात पाहिले नाही. कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे या गोष्टी विरोधकांना माहिती नाहीत. केवळ परचेप्शन क्रिएट करण्याकरिता म्हणजेच निवडणुकीत आपण हरलो त्यापूर्वीच ते परचेप्शन क्रिएट करताहेत. विरोधक काल राज्याचे निवडणूक अधिकारी आहेत त्या चोक्कलिंगम यांच्याकडे गेले होते. चोक्कलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काहीच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी वेगळे निवडणुक निर्णय अधिकारी आहेत. निवडणुक यादी अंतिम करण्यापूर्वी हरकती मागविल्या जातात, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी जायायला पाहिजं होतं, तेव्हाच तक्रार करायला हवी होती, मात्र तेव्हा तक्रार, हरकत न घेता आता काही तरी नरेटिव्ह पसरविण्यासाठी विरोधकांकडून मतदार याद्यात घोळ असल्याचे पुढे केलं जात आहे हे हास्यास्पद आहे. विरोधकांचे हे हास्यास्पद गोष्टी समोर येत असल्यानेच आज शरद पवार हे त्यांच्यासोबत गेले नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition's Election Commission visits a 'fiasco,' says Fadnavis in sharp criticism.

Web Summary : Fadnavis criticized the opposition's election commission complaints regarding voter lists. He stated they lack knowledge of procedures and are creating a false narrative of electoral malpractice after failing to raise objections at the appropriate time. He said Pawar's absence shows the weakness of the claims.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाElectionनिवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी