शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

पालखीमार्ग रुंदीकरणाला विरोध

By admin | Updated: August 2, 2016 01:35 IST

इंदापूर तालुक्यातील पालखीमार्ग रुंदीकरणाला महमार्गाशेजारील गावांनी विरोध दर्शविला

लासुर्णे : इंदापूर तालुक्यातील पालखीमार्ग रुंदीकरणाला महमार्गाशेजारील गावांनी विरोध दर्शविला. ज्या वेळी अतिक्रमण काढणार आहेत, त्या वेळी गावकरी रस्त्यावर उतरणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत गावकऱ्यांनी आमदार, खाासदार व पालकमंत्री यांनाही निवेदने दिली आहेत. संत तुकाराममहाराज व ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्या वेळी वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे. या दोन्ही सोहळ्यांना गर्दी वाढत आहे. भविष्यात पालखी सोहळ्याच्या वेळी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी तसेच वाहतुकीच्या समस्येसाठी केंद्रीय रस्तेविकास महामंडळाने या दोन्ही राज्य महामार्गांचे रुंदीकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी लवकरच या पालखीमार्गाच्या बारामती-इंदापूर या मुख्य रस्त्यावर सध्या मोजणी सुरू झाली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतजमिनी, राहती घरे व दुकाने बाधित होणार आहेत. गावेच्या गावे विरोध करणार आहेत. ज्या वेळी घरे व दुकाने काढणार, त्या वेळी गावकरी रस्त्यावर उतरून विरोध करणार असल्याचे बोलले जाते. या वेळी शासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्ते दळणवळण हा राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा आहे हे शंभर टक्के बरोबर असले, तरी हे होत असताना यामध्ये समाजातील तीन घटक भरडले जातात. जे की पिढ्यान् पिढ्या या जागेवर व्यवसाय करून आपले कुटुंब चालवतात. या रुंदीकरणामुळे या व्यापाऱ्यांवर मोठे संकट येणार असून, त्यांचे प्रंपच उघड्यावर येतील. यामुळे या रुंदीकरणाला आमचा विरोध आहे. आमदार, खासदार व पालकमंत्री यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात आम्ही तीन पर्याय दिले आहेत. यामध्ये जपालखीमार्ग रुंदीकरणाला ग्रामस्थांचा विरोध गावातून रुंदीकरण होणार असेल, तर हद्द कमी करावी. दुसरा हडपसरसारखा एकखांबी उड्डाणपूल बांधावा म्हणजे पुलाच्या खालूनही वाहतूक होईल. तिसरा गावाच्या बाहेरून बायपास काढण्यात यावा. >ग्रामस्थांचा विचार व्हावापिढ्यान् पिढ्या घर बांधून वास्तव्यात असणारे, तसेच शेतकरी शेती करून आपले पोट भरतो. तसेच शासनाने दिलेल्या मोबदल्यात या भरडलेल्या व्यक्ती स्थिरस्थावर होणार का, याचा विचार शासनाने करावा. कारण, शासनाने या कामाची निविदा काढण्याअगोदर या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे, असे येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन वाकसे यांनी सांगितले. तर, निमगाव येथील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ डोंगरे म्हणाले, की निमगावमध्ये रस्त्याच्या दुतर्फा छोटे व्यापारी गाळे असून, त्यावर त्यांची रोजीरोटी अवलंबून आहे.