शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकलेच्या ऑनलाईन परिक्षेला विरोध; मुलांनी दहावीची सराव व प्रात्यक्षिक परीक्षा द्यायची की चित्रकलेची? पालक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 10:31 IST

Exam News: राज्यभर दहावी बारावीच्या परिक्षा ऑफलाईन होणार असल्याचे शासनाने जाहीर केले असताना वाढीव गुणांसाठी महत्वाची समजली जाणारी  इंटरमिजिएट चित्रकला परिक्षा मात्र ऑनलाईन घेण्याचा घाट शासनाने घातला आहे. याला पालकांनी कडाडून विरोध केला आहे.

-  कानिफनाथ गायकवाड

अहमदनगर  - राज्यभर दहावी बारावीच्या परिक्षा ऑफलाईन होणार असल्याचे शासनाने जाहीर केले असताना वाढीव गुणांसाठी महत्वाची समजली जाणारी  इंटरमिजिएट चित्रकला परिक्षा मात्र ऑनलाईन घेण्याचा घाट शासनाने घातला आहे. याला पालकांनी कडाडून विरोध केला आहे.

दि. 10 रोजी नवीन परिपत्रक काढून शासनाने हा निर्णय घामेतला आहे .ही परिक्षा 22/23 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठीची नाव नोंदणी 20 फेब्रुवारीपर्यंत करण्याचे पत्रकात म्हटले आहे. आता मुले दहावीच्या परिक्षेत व्यस्त असताना या चित्रकलेच्या परिक्षेची कार्यवाही  करण्यासाठी वेळ कसा देणार यावर विद्यार्थी व पालक वर्गात संभ्रम आहे.

 जी परिक्षा प्रात्यक्षिक स्वरुपात द्यावी लागते ती ऑनलाईन घेणे तसेच ग्रामीण भागात नेट मोबाईल असे अनेक अडचणी असताना असे ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेणे योग्य नाही. यास अहमदनगर कलाशिक्षक संघटनेने कडाडून विरोध केला आहे. मागील आठवडय़ात संघटनेची बैठक झाली. यामध्ये एकमताने या अशा स्वरुपाच्या परिक्षेस विरोध असल्याचे निवेदन जिल्हाअध्यक्ष संजय पठाडे यांनी दिले आहे.          सध्या दहावीचे विद्यार्थी पुर्व आणि सराव परिक्षा तसेच विज्ञानाची प्रात्यक्षिक परिक्षा देण्यात वेस्त आहेत अशात हि मुले वाढीव गुणांसाठी चित्रकलेची इंटरमिजिएट परिक्षा कशी देणार हा प्रश्न पालकांना पडला आहे. शासनाकडून जाणून बुजून कला विषयाकडे दुर्लक्ष करण्याचा यातून प्रकार दिसत असल्याचे मत जिल्हाध्यक्ष संजय पठाडे यांनी व्यक्त केले आहे.

दोन वर्षापुर्वी एलिमेंटरी परिक्षा झालेल्या आहेत त्या परिक्षेचा निकालही विद्यार्थ्यांकडे आहे तेच गुण वाढीव गुणांसाठी ग्राह्य धरावे अशी मागणी जिल्हा संघटनेने केली आहे.  यावर शासनाने विचार करुन पालक आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी संघटनेने केली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा