शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी केली सरकारची कोंडी

By admin | Updated: March 29, 2016 04:11 IST

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने मंत्रालयासमोर केलेली आत्महत्या, महाड येथील चवदार तळ्याच्या शुद्धीकरणाचा कथित कार्यक्रम आणि फर्ग्युसनमधील आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांवर

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने मंत्रालयासमोर केलेली आत्महत्या, महाड येथील चवदार तळ्याच्या शुद्धीकरणाचा कथित कार्यक्रम आणि फर्ग्युसनमधील आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवरून कमालीच्या आक्रमक झालेल्या विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. ‘जयभीम’ म्हणणे देशद्रोह ठरणार असेल आणि चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले जात असेल तर हा तमाम आंबेडकरी जनतेचा आणि संपूर्ण समाजाचा अवमान आहे, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी १९ मार्च रोजी महाडच्या चवदार तळ्याचे शुद्धीकरण करून तमाम आंबेडकरी जनतेचा व संपूर्ण समाजाचा अवमान केल्याचा आरोप करीत या प्रकरणी सरकारने माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. तसेच मंत्रालयाच्या दारात येऊन नांदेड जिल्ह्यातील शेतकरी माधव कदम यांनी केलेली आत्महत्या सरकारसाठी लाजिरवाणी बाब असून कामकाज बाजूला सारून त्यावर चर्चेची मागणी केली. शेतकरी आत्महत्या हा स्थगन प्रस्तावाचा विषय होऊ शकत नाही, असे सांगत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्यावर विरोधक अधिकच आक्रमक झाले. कदम यानी केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे; परंतु त्यांना सरकारकडून मदत मिळाली नाही, ही पूर्णपणे चुकीचे असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. कदम यांच्या नावे १ हेक्टर ९ आर. जमीन असून त्यांना नुकसानभरपाई म्हणून सरकारने ४,६०० रुपये मदत त्यांच्या खात्यावर जमा केल्याचे त्यांनी सांगितले.कापूस पिकाबाबत सरकारचे धोरण ठरले असून याचा अंतिम निर्णय झाल्यावर उर्वरित आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. सरकारच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने गदारोळ सुरूच राहिला. सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी दोन वेळा सभात्याग केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर आरोपांचा भडिमार केला. गोंधळातच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावर गेल्या आठवडयात तीन दिवस झालेल्या चर्चेला उत्तर दिले.गोंधळातच शालेय शिक्षण,आदिवासी विकास आदी विभागांच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्या मांडण्यात आल्या आणि त्या चर्चेशिवाय मंजूरदेखील झाल्या. सरकारमध्ये असल्याची लाज वाटते : सेना आमदारनांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनीही कदम यांच्या आत्महत्येवरून सरकारला धारेवर धरले. माधव कदम हा माझा कार्यकर्ता होता. त्याला तोटक्या मदतीसाठी सरकारचे उंबरठे झिजवावे लागले.आमच्या सरकारमध्ये हे घडत आहे, असा हल्लाबोल पाटील यांनी खडसे यांच्यावर केला. हा सारा प्रकार पाहून सत्ताधारी पक्षात असल्याची लाज वाटत असल्याचा घरचा अहेर त्यांनी दिला. महिला आमदार आक्रमकचवदार तळे व फर्ग्युसनमधील प्रकरणावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदारांनी सोमवारी विधानसभेत आक्र मक पवित्रा घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशी घोषणा देत जयभीम बोलणे गुन्हा आहे का, असा सवाल वर्षा गायकवाड, निर्मला गावित, अमिता चव्हाण, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, ज्योती कलानी यांनी यावेळी सरकारला केला.विरोधकांचा सवाल...राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी चवदार तळ्याच्या कथित शुद्धीकरणाचा मुद्दा उचलून धरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह करून ज्या चवदार तळ्याचे पाणी सर्वांना खुले केले, ते पाणी शुद्धीकरण करून सत्ताधारी कोणता संदेश देऊ इच्छितात, असा सवाल त्यांनी केला. त्यावर आपण शुद्धीकरण नव्हे तर, जलपूजन केल्याचा खुलासा शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांनी केला. जलपूजन हा सरकारचा कार्यक्रम असून आपण अधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून उपस्थित राहिलो, असे त्यांनी सांगितले. मात्र, सरकारच्या परिपत्रकात जलपूजनाचा कुठेही उल्लेख नसल्याची बाब काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिली. जलपूजन हा सरकारी कार्यक्रम होऊच कसा शकतो, असा सवाल करत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आंबेडकरी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी जयभीमचा नारा दिल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाते, हा कुठला न्याय आहे, असा सवाल विरोधकांनी केला.(प्रतिनिधी)