नाशिक : आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजात जातीय विषमता वाढल्याचे उद्गार कोल्हापूर येथील खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी काढले. तथापि, आपण फक्त मराठा समाजासाठीच काम करीत नसून, संपूर्ण बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नाशिक जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या उत्तमहिरा सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, जातीय चश्म्याऐवजी प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहायला हवे. छत्रपती शिवराय, शाहू महाराजांनी फक्त मराठा समाजासाठी नव्हे, तर अठरापगड जाती व बारा बलुतेदारांसाठी स्वराज्य मिळवले व वाढवले. १८९४ मध्ये शाहू महाराजांनी जातिभेदाविरोधात संपूर्ण भारतभरात वेगळा संदेश दिला. (प्रतिनिधी)शिवरायांच्या घराण्याचा सन्मानपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी राज्यसभेच्या खासदारपदी केलेली आपली नियुक्ती हा आपला नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा सन्मान असल्याचेही या वेळी संभाजी महाराज म्हणाले.
आरक्षणाअभावी मराठा समाजात विषमता
By admin | Updated: July 8, 2016 00:44 IST