शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद तूर्त शाबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:04 IST

नारायण राणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि समर्थक आमदार कालिदास कोळंबकर सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत

मुंबई : नारायण राणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि समर्थक आमदार कालिदास कोळंबकर सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला तेव्हाच नितेश आणि कोळंबकर यांची तटस्थतेची भूमिका निश्चित झाली असली तरी त्यामुळे विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद मात्र तूर्तास शाबूत असल्याचे चित्र आहेकाँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे याच जागेवर भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू शकतात. मात्र विधानसभेची पोटनिवडणूक म्हणावी तेवढी सोपी नसल्याची जाणीव राणे व कोळंबकर यांना आहे. २०१४ च्या निवडणुकीत नितेश राणे कणकवली तर कालिदास कोळंबकर वडाळा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. या दोघांनी काँग्रेस सोडली असती तर विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला असता. कोकणात अजूनही शिवसेनेची ताकद आहे, तर वडाळा मतदारसंघात कालिदास कोळंबकर यांचे काम मोठे असले तरी मागील निवडणुकीत त्यांची दमछाक झाली होती. अवघ्या काही शे मतांनी ते निवडून आले होते. सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता पोटनिवडणूक सोपी नसल्याने नितेश आणि कोळंबकर यांनी सध्या तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्येच राहणे पसंत केल्याची चर्चा आहे.नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांच्या या भूमिकेमुळे विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद तूर्तास शाबूत असल्याचे चित्र आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ इतके संख्याबळ आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे.नारायण राणे यांच्यासोबत नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसचा त्याग केला असता तर काँग्रेसचे संख्याबळ ४० वर आले असते आणि विरोधी पक्षनेतेपदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळ्यात पडली असती.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी