शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

"आजची वानवा असलेल्या शेतकऱ्याला २०४७ च्या गोष्टी..."; आर्थिक सर्वेक्षणावरुन दानवे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 10:22 IST

Ambadas Danve : अर्थसंकल्पापूर्वी देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली.

Economic Survey 2024 : मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी सरकारने आर्थिक सर्वेक्षण सादर केला. या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राचा विकास दर घरसल्याचे समोर आलं आहे. देशातील कृषी क्षेत्राचा विकास दर २०२३-२४ मध्ये १.४ टक्क्यांपेक्षा कमी होण्याचा अंदाज अर्थसंकल्पपूर्व देशाच्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला. भारतीय कृषी क्षेत्र सुमारे ४२.३ टक्के लोकसंख्येला उपजीविका पुरवते आणि जीडीपीत याचा १८.२ टक्के वाटा आहे. दुसरीकडे, आर्थिक सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती ही कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी ही गंभीर बाब समजली जात आहे. यावरुनच विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे.

अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला. यामध्ये  कृषी क्षेत्राचा विकास दर खूपच कमी झाल्याचे म्हटले आहे. कृषी क्षेत्राचा विकास दर २०२३-२४ या वर्षात १.५ टक्क्यांपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या आणि गेल्या ५ वर्षांच्या सरासरी विकास दराच्या एक तृतीयांशपेक्षा कमी असेल. याबाबत अंबादास दानवे यांनी भाजपने २०४७ वगैरेचा भंपकपणा आता बंद करावा, असं म्हटलं आहे. 

"देशातील आर्थिक पाहणी अहवालातून काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत.  देशातील ४३.३ टक्के लोकांना उपजीविका देणाऱ्या, जीडीपीत १२.८ वाटा असणाऱ्या कृषी क्षेत्राचा विकास दर हा अवघा १.४ टक्के इतका खाली आला आहे. केवळ किसान सन्मान योजनेचा फार्स दाखवून आता चालणार नाही. निवडणूक संपल्या आहेत, त्यामुळे २०४७ वगैरेचा भंपकपणा भाजपने आता बंद करावा. आजच्या दिवशीची वानवा असलेल्या शेतकऱ्याला २०४७ च्या गोष्टी सांगणे हे त्यासाठी निव्वळ मृगजळ आहे," असे अंबादास दानवे यांनी म्हटलं.

दरम्यान, कृषी क्षेत्राने गेल्या ५ वर्षांत स्थिर किंमतींवर सरासरी वार्षिक ४.१८ टक्के वाढ मिळवली. मात्र आर्थिक सर्वेक्षणात, २०२३-२४ या वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर केवळ १.४ टक्के असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही टक्केवारी २०२२ च्या ४.७ टक्के वाढीच्या एक तृतीयांशपेक्षा कमी आहे. तसेच, गेल्या पाच वर्षांच्या सरासरी विकासदराच्या हे प्रमाण केवळ एक तृतीयांश आहे.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBudgetअर्थसंकल्प 2024Farmerशेतकरी