शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा आत्मविश्वास हरवलाय : मुख्यमंत्री; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 07:13 IST

रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारची विकासकामे पाहून विरोधकांचा आत्मविश्वास हरवला आहे. त्यामुळे त्यांनी चहापानावर बहिष्कार घालण्याची परंपरा आजही कायम ठेवलीय, त्यांना जनतेच्या कामापेक्षा राजकारणात जास्त रस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 

रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, हे डबल इंजिन सरकार चांगले काम करतेय. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. मराठा समाजाबाबत दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि राज्यातील अटल सेतु, कोस्टल रोड, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह राज्यातील जनतेची कामे करण्याला सरकार प्राधान्य देत आहे.

सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला : फडणवीस विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा कळवला. नेमके कशावर लक्ष केंद्रीत करावे, हे विरोधी पक्षांना लक्षात येत नाहीये. त्यामुळे त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठा समाजासंदर्भात १० टक्के आरक्षणाचा कायदा तयार करून सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे, असेही ते म्हणाले.

एक पत्र त्यांनाही द्या...विरोधकांच्या पत्रात एक वाक्य मला मनोरंजक वाटले. त्यात म्हटलेय सभांमध्ये अर्वाच्य भाषा, शिवीगाळ यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागले, आता हे पत्र आमच्यासाठी लिहिलेय, की रोज सकाळी जे पत्रकार परिषद घेतात, त्यांच्यासाठी? महाराष्ट्राच्या संस्कृतीची चिंता असेल, तर एक पत्र त्यांनाही द्या, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना नाव न घेता लगावला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन