शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

कृषी विद्यापीठ विभाजनास विरोध

By admin | Updated: August 11, 2015 01:26 IST

राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांवर विभाजनाची टांगती तलवार कायम असून, त्यास विद्यार्थी व अधिकाऱ्यांचाच तीव्र विरोध होत आहे. विद्यापीठ विभाजनाच्या

राहुरी (अहमदनगर) : राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांवर विभाजनाची टांगती तलवार कायम असून, त्यास विद्यार्थी व अधिकाऱ्यांचाच तीव्र विरोध होत आहे. विद्यापीठ विभाजनाच्या पहिल्या समितीला विरोध झाला होता़ दुसरी समिती सप्टेंबरमध्ये राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देऊन अहवाल तयार करणार आहे़परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ बी़ व्यंकटेश्वरलु यांच्या अध्यक्षतेखालील दुसरी समिती विद्यापीठ विभाजनाचा आढावा घेणार आहे़ समितीमध्ये चार कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक, कुलसचिव यांचा समावेश आहे़ वाय़ पी़ एस़ थोराज यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पहिल्या समितीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता़ त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी विभाजनाला विरोध दर्शविला होता़ राज्यात महात्मा फुले, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख व बाळासाहेब सावंत यांच्या नावाची चार कृषी विद्यापीठे आहेत़अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्व विदर्भाचा विकास व्हावा म्हणून स्वतंत्र कृषी विद्यापीठाची मागणी केली होती़ अकोले विद्यापीठाचे विभाजन करण्यावर विधानसभेत चर्चा झाली होती़तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुरी विद्यापीठाचे विभाजन करण्यास हिरवा कंदील दाखविला होता़ अकोले विद्यापीठात अकरा तर राहुरी विद्यापीठांतर्गत दहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे़ देवेंद्र फडवणीस यांचे मूल हे जन्मगाव आहे़ अकोले विद्यापीठाचे विभाजन होऊन मूल येथे विद्यापीठ मंजूर झाल्यास मुख्यमंत्र्यांची ती मूलकरांना भेट असेल. तर एकनाथ खडसे हे जळगावला कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास इच्छुक आहेत. विद्यापीठ विभाजनासाठी नेमलेल्या पहिल्या समितीला विद्यार्थ्यांनी मोठा विरोध केला होता़ आता दुसरी समिती सप्टेंबरमध्ये येणार आहे़ समिती राज्य सरकारला अहवाल देईल़ त्यानंतर सरकार विभाजनाबाबत निर्णय घेईल़- डॉ़ तुकाराम मोरे,कुलगुरु, राहुरी कृषी विद्यापीठ