शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर टीका करण्याची विरोधकांत स्पर्धा; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 07:55 IST

खड्डेमुक्त मुंबई, ठाण्याकरिता अभियान, कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला असं शिंदे म्हणाले.

ठाणे : राज्यात होत असलेला विकास विरोधकांना रुचत व पचत नसल्यानेच सरकारवर आणि माझ्यावर टीका करण्याची स्पर्धा लागली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांना टीका करायची असेल तर त्यांनी टीका करत राहावी. या सर्वांना विकासकामानेच उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष अभियान घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाचा प्रारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. उद्योग बाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, एखादा मोठा उद्योग हा एका महिन्यात बाहेर जात नसतो. मात्र, सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे हा पहाटेपर्यंत काम करतो. या आरोपांना मी कामाने उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आला काय, गेला काय कोणाला चिंता नसते. मात्र, नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मी झोपतो कधी याची चिंता विरोधकांनी करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि ते सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे असतील. सिंचनाच्या बंद पडलेल्या १६ योजना सुरू केल्या. उद्योग क्षेत्रात २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे, त्यामुळेच राज्याचा विकास होत असल्याने विरोधकांना विकास पचत नसल्यानेच माझ्यावर टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

धडाडीचे निर्णय घेतो म्हणून मुख्यमंत्री केले मुख्यमंत्री कोण होईल, याची सर्वांना उत्सुकता होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मला संधी दिली.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले, असे शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

आयुक्तांकरिता पुढची दालने उघडी होतात ठाणे महापालिका आयुक्त अभिजत बांगर यांनी नवी मुंबईत माझी अपेक्षा पूर्ण केली. म्हणून त्यांना ठाण्याची जबाबदारी दिली. तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील राज्याच्या महत्त्वाचा उद्योग विभाग एमआयडीसी देण्यात आला. त्यामुळे ठाण्यात जे आयुक्त म्ह्णून येतात त्यांची पुढची दालने उघडी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे