शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

डावललेल्या अधिकाऱ्यास आयपीएस बढतीची संधी

By admin | Updated: July 16, 2017 01:10 IST

महाराष्ट्र पोलीस सेवेतून भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) बढतीसाठी तयार करण्यात आलेल्या सन २०१४ च्या यादीचा फेरविचार करण्यासाठी निवड समितीने पुन्हा

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र पोलीस सेवेतून भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) बढतीसाठी तयार करण्यात आलेल्या सन २०१४ च्या यादीचा फेरविचार करण्यासाठी निवड समितीने पुन्हा बैठक घ्यावी आणि संजय विलास शिंत्रे यांच्या नावाचा विचार करावा, असा आदेश केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) महाराष्ट्र सरकार व केंद्रीय लोकसेवा आयोगास दिला आहे.मुंबईत भायखळा (पू.) येथील पोलीस अधिकारी क्वार्टर्समध्ये राहणारे शिंत्रे दौंड, जि. पुणे येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्र. ५ चे कमांडन्ट आहेत. आपल्याला डावलून निवड समितीने सेवाज्येष्ठता यादीत खालच्या क्रमांकावर असलेल्या मनोज जी. पाटील यांचा विचार केला म्हणून शिंत्रे यांनी ‘कॅट’कडे याचिका केली होती. पाटील हे राज्य राखीव पोलीस दलाच्या रामटेकडी, पुणे येथील गट क्र. २ चे कमांडन्ट आहेत.शिंत्रे यांची याचिका मंजूर करून ‘कॅट’चे न्यायिक सदस्य दिनेश गुप्ता व प्रशासकीय सदस्य आर. रामानुजम यांनी असा आदेश दिला की, सन २०१४ ची निवड यादी ठरविण्यासाठी सन २०१५मध्ये स्थापन केलेल्या समितीने सन २००३ च्या अंतिम सुधारित यादीनुसार शिंत्रे यांच्या नावाचा तीन महिन्यांत फेरविचार करावा. सेवाज्येष्ठता, गुणवत्ता व अन्य निकषांवर ते बढतीसाठी पात्र असल्यास त्यानंतरच्या दोन महिन्यांत त्यासाठीचे आदेश काढले जावे.निवड समितीची सन २०१५ मध्ये बैठक झाली तेव्हा पोलीस उपअधीक्षकांच्या सन २००३ च्या सेवाज्येष्ठता यादीत पाटील १३३ तर शिंत्रे १४५ व्या स्थानावर होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला गेला नव्हता. मात्र त्यानंतर शिंत्रे यांनी या ज्येष्ठता यादीविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागितली व त्यांचे नाव सेवाज्येष्ठता यादीत पाटील यांच्या वर म्हणजे १३२ए या स्थानावर आले. ज्येष्ठता यादीतील ही सुधारणा निवड यादी तयार झाल्यानंतर करण्यत आली होती. त्यामुळे समितीने आता पुन्हा बैठक घेऊन त्यानुसार त्या यादीचा फेरविचार करावा, असे ‘कॅट’ने म्हटले. तसेच समितीची सन २०१५ मध्ये झालेली बैठक पुन्हा घेताना सन २०१६ च्या यादीचा विचार करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.या सुनावणीत शिंत्रे यांच्यासाठी अ‍ॅड. आर. जी. पांचाळ यांनी तर प्रतिवादींसाठी अ‍ॅड. व्ही. बी. मसुरकर, अ‍ॅड. व्ही. बी. जोशी व अ‍ॅड. एम. के. राजपुरोहित यांनी काम पाहिले.यादीचा विचार नाहीसन २०१६ मध्ये तयार केलेल्या सेवाज्येष्ठता यादीत शिंत्रे यांचे नाव पुन्हा आपल्यापेक्षा खालच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता त्यांच्या नावाचा विचार करता येणार नाही, असे पाटील यांचे म्हणणे होते. परंतु ते अमान्य करताना ‘कॅट’ने म्हटले की, समितीची सन २०१५ मध्ये झालेली बैठक पुन्हा घेताना सन २०१६ च्या यादीचा विचार करता येणार नाही.