शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्राबाबत विरोधकांची आक्रमक भूमिका, मंत्री नसल्याने राखला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:25 IST

विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचे सादरीकरण न झाल्यामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधकांनी लावून धरला. या प्रश्नाशी संबंधित एक मंत्री सभागृहात नसल्यामुळे प्रश्नच राखून ठेवण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. प्रश्नाची व्याप्ती व गंभीरता लक्षात घेता सभापतींनीदेखील प्रश्न राखून ठेवण्याची सूचना केली. एकप्रकारे सरकारला सभागृहात नामुष्कीचाच सामना करावा लागला.

योगेश पांडेनागपूर : विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचे सादरीकरण न झाल्यामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधकांनी लावून धरला. या प्रश्नाशी संबंधित एक मंत्री सभागृहात नसल्यामुळे प्रश्नच राखून ठेवण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. प्रश्नाची व्याप्ती व गंभीरता लक्षात घेता सभापतींनीदेखील प्रश्न राखून ठेवण्याची सूचना केली. एकप्रकारे सरकारला सभागृहात नामुष्कीचाच सामना करावा लागला.हेमंत टकले, सुनील तटकरे, ख्वाजा बेग व अ‍ॅड.जयदेव गायकवाड यांनी या मुद्यावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने २०१७ मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील ३५३ विद्यार्थ्यांचे वैद्यकीय व अभियांत्रिकीचे प्रवेश रद्द करण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया विद्यार्थ्यांचे हमीपत्राद्वारे प्रवेश व्हावेत, असे उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. मात्र ४ आॅगस्ट २०१७ रोजी सदर आदेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले, असे उत्तर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. हा प्रश्न वैद्यकीय व अभियांत्रिकी अशा दोन्ही विद्यार्थ्यांचा आहे. मात्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तसेच सामाजिक न्यायमंत्री नसल्याने पूर्ण व योग्य माहिती मिळत नसल्याने हा प्रश्न राखून ठेवावा, अशी मागणी जयंत पाटील व सुनील तटकरे यांनी केली. हरिभाऊ राठोड यांनीदेखील सरकारवर हल्लाबोल केला व रक्ताच्या नातेवाईकांचे जात प्रमाणपत्रदेखील नाकारण्यात येत असल्याने हा उच्चस्तरीय सामाजिक भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. प्रवेशाची वेळ आली की या प्रमाणपत्रांचे दर वाढतात, असा आरोप हेमंत टकले यांनी केला. या मुद्यावर गिरीश महाजन यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. या मुद्यावर संंबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून एकत्रित उत्तर येणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन करत अखेर सभापतींनीदेखील हा प्रश्न राखून ठेवण्याचे निर्देश दिले.