शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

सरकारच्या मदतीला विरोधक धावले! मेहतांच्या गैरव्यवहारावर गुपचिळी; तावडेंच्या मदतीला राणे आलू धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 05:06 IST

मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन परस्पर निर्णय घेणा-या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा मागण्याची संधी काल सोडून दिलेली असतानाच, आज शिक्षणमंत्री मंत्री विनोद तावडे यांच्यावर शिवसेनेने आणलेला हक्कभंग काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हाणून पाडला.

अतुल कुलकर्णी ।मुंबई : मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन परस्पर निर्णय घेणा-या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा मागण्याची संधी काल सोडून दिलेली असतानाच, आज शिक्षणमंत्री मंत्री विनोद तावडे यांच्यावर शिवसेनेने आणलेला हक्कभंग काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हाणून पाडला.पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यापेक्षा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचेच काम विरोधी पक्ष करताना दिसत आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा मागण्याची संधी विरोधकांनी सोडून दिली, शेतकºयांच्या पीक विम्यावरुन सरकारची कोंडी करता आली नाही. तर मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर शिवसेनेने आणलेला हक्कभंग काँग्रेस राष्टÑवादीने मांडू दिला नाही. विशेष म्हणजे, उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी निर्णय राखून ठेवत भाजपाला मदत करण्याचीच भूमिका घेतली.मुंबई विद्यापीठातील परीक्षांच्या निकालावरून शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनी विधान परिषदेत शिक्षणमंत्री तावडे यांच्याविरुध्द हक्कभंगाची सूचना मांडली. मात्र, सत्ताधारी सदस्याला सरकारविरोधात हक्कभंग दाखल करता येत नाही, असे सांगत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिवसेनेच्या सूचनेला विरोध करत आणि नियमांवर बोट ठेवत सेनेच्या हक्कभंग सूचनेस हरकत घेतली.‘अर्थ’पूर्ण मौन?गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एस.डी. कॉर्पोरेशनला मुख्यमंत्र्यांचे नाव वापरुन ५०० ते ७०० कोटींचा फायदा करुन दिल्याचा ठपका असताना त्यांचा राजीनामा मागण्याची संधी विरोधकांनी गमावली. विरोधकांच्या या मौनाचे अनेक ‘अर्थ’ काढले गेले. कदाचित, आपलाही भूजबळ होईल, म्हणून सगळे गप्प असतील, अशी मार्मिक प्रतिक्रिया विरोधीपक्षातील काही आमदारांनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोडले तर महेता यांच्या राजीनाम्याची मागणी एकाही नेत्याने लावून धरलेली नाही.शिवसेनाही गप्पएरव्ही भाजपावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाºया शिवसेनेच्या आमदारांना मेहतांचा विषय सभागृहात काढू नका, अशा सूचना असल्याचे सेनेच्याच आमदारांनी खाजगीत सांगितले. आम्हाला बोलायचे होते, पण आदेश असल्याने आम्ही गप्प बसलो यावरुन काय समजायचे ते समजा, असे आमदारांचे म्हणणे होते.शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. सत्ताधारी सदस्याला सरकारविरोधात हक्कभंग आणता येत नाही. सरकारमधून आधी बाहेर पडा आणि मगच हक्कभंग मांडा - नारायण राणे, काँग्रेससरकारमध्ये राहून त्यांच्यावरच टीका करणे बरे नाही. - सुनील तटकरे, राष्ट्रवादी