शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन ‘कलश’ उधळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2016 01:32 IST

प्रजासत्ताक दिनाच्या सुमारास भारतात किमान सात ठिकाणी ‘कलश’ ठेवा, या इसिसच्या शफी अरमान ऊर्फ युसूफ याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुदब्बीर शेख याच्यावर सोपवण्यात

- जितेंद्र कालेकर , ठाणेप्रजासत्ताक दिनाच्या सुमारास भारतात किमान सात ठिकाणी ‘कलश’ ठेवा, या इसिसच्या शफी अरमान ऊर्फ युसूफ याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुदब्बीर शेख याच्यावर सोपवण्यात आली होती. हे कलश कधी व कुठे ठेवायचे, याचा निरोप येण्यापूर्वीच अमेरिकी गुप्तचर संघटनेच्या माहितीवरून ‘एनआयए’आणि ‘एटीएस’ने मुंब्रा येथे छापा घालून शेखला ताब्यात घेतल्याने एक मोठा कट उधळला गेल्याचा दावा एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. इसिसमध्ये ३०० तरुणांची भरती करण्याची जबाबदारीही शेख पार पाडत होता, असेही समजते.‘भारत में सात जगह कलश रख दो’, असा सांकेतिक भाषेतील मेल अमेरिकन गुप्तचर संघटना ‘सीआयए’ (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी) ला मिळाला होता. त्याच माहितीचा पाठपुरावा केल्यानंतर एनआयए (भारताची राष्ट्रीय तपास संस्था) ला इसिसचा भारतामधील म्होरक्या मुदब्बीर शेख आणि त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली. आतापर्यंत आॅपरेशन कलशमध्ये सहभागी झालेल्या १८ ते २० जणांची धरपकड करण्यात आली आहे. मूळचा भारतीय असलेला युसूफ हा सीरियातून भारतात आपले जाळे पसरवण्यासाठी तसेच संभाव्य बॉम्बहल्ले करण्यासाठी मुख्य कमांडरची भूमिका बजावतो. त्यानेच भारतात आॅपरेशन ‘कलश’ राबवण्याचा कट आखला होता. तो यशस्वी करण्याची जबाबदारी मुदब्बीर आणि हैदराबादचा मोहम्मद नफीस खान यांच्यावर होती. मुदब्बीर शेख आणि मोहम्मद नफीस खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात पाय रोवण्यासाठी ‘इसिस’ने ‘जनूद उल खलिफा-ए-हिंद’ या नावाने आपले जाळे पसरविण्यास सुरुवात केली होती. इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक ‘जिहादी’ सदस्य बनवायचे, हे लक्ष्य आहे. मुदब्बीरमार्फत तरुणांना जाळ्यात ओढायचे व नेटद्वारेच पुढील सर्व आदेश द्यायचे, अशी यंत्रणा युसूफने राबविली होती. एनआयएच्या ताब्यात न आलेले आणखी किमान १० ते १२ जण यात गुंतल्याची शक्यता आहे. किमान ३०० जणांना जिहादसाठी तयार करण्याची इसिसची योजना यशस्वी करण्याचा मुदब्बीरचा डाव होता, असेही ‘एनआयए’च्या तपासात उघड झाले आहे....तर ‘जन्नत’मध्ये प्रवेशइसिससारख्या अतिरेकी संघटनेत काम करून इस्लाम वाढविण्यासाठी काम करणे म्हणजे जन्नत (स्वर्गात) प्रवेश मिळविण्यासारखेच आहे, असा त्याचा भ्रम होता आणि तेच तो त्याची पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीलाही सांगत होता. हाच संदेश इतरांना देऊन त्यांनाही यात ओढण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता, असे सूत्रांनी सांगितले.मुदब्बीरकडे मिळाले स्फोटकाचे साहित्य : मुदब्बीरकडे स्फोटके मिळाल्याच्या वृत्ताला सुरुवातीला एटीएसकडून अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. मात्र, त्याच्याकडे टायमर, सर्किट तयार करण्याचे मटेरियल आणि काही प्रमाणात फॉस्फरस अशी बॉम्ब बनविण्याची सामग्री मिळाल्याची माहिती त्याच्या घरावर धाड टाकणाऱ्यांपैकी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी ‘लोकमत’ला दिली.मुदब्बीरच्या सासऱ्यांनी दिल्लीला जाणे टाळलेमुदब्बीर शेख याचे सासरे अहमद मिया हे सध्या कमालीच्या मानसिक तणावाखाली असून न्यायालय मुदब्बीरबाबत कोणती भूमिका घेते, ते स्पष्ट झाल्याखेरीज दिल्लीला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दिल्लीला जाण्याचे रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने आपण जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.