शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पदविकाधारकांमधून राज्यभरातील कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ पदे भरण्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 19, 2016 20:11 IST

राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ पदे पदविकाधारकांमधून भरतीसाठीच्या जाहिरातील आव्हान देणाऱ्या

- पदवीधारकांच्या सर्व याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याऔरंगाबाद - राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ पदे पदविकाधारकांमधून भरतीसाठीच्या जाहिरातील आव्हान देणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांनी फेटाळल्या. परिणामी वरील पदांसाठीच्या राज्यस्तरीय नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला. या आदेशासोबतच खंडपीठाने यापुर्वी पदवीधारकांना सुद्धा वरील पदांसाठी अर्ज करण्याची दिलेली मुभा आणि राज्य शासनाने निवड प्रक्रिया राबविण्यास मान्यता देणारा अंतरीम आदेश खंडपीठाने रद्द केला.राज्यस्तरीय निवड समितीने १५ फेब्रुवारी २०१६ रोजी सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ची १२५६ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. वरील पदांसाठी केवळ ह्यपदविकाधारकांकडूनह्ण अर्ज मागविले होते. या जाहिरातीस बीड येथील पदवीधारक संग्राम घोळवे व इतर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) आव्हान दिले. अर्जदार हे पदवीधारक उच्च विद्याविभूषित आहेत. वरील पदांसाठी त्यांना अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती, ती मॅटने फेटाळली. म्हणून वरील अर्जदारांनी औरंगाबाद खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. . त्यांचे असे म्हणणे होते की, ते उच्च विद्याविभूषित आहेत. त्यामुळे पदविकाधारकांऐवजी त्यांचा विचार व्हावयास हवा. राज्य शासनाची वरील पदांसाठीची निवड प्रक्रिया मनमानी आणि असंवैधानीक आहे, ती रद्द करुन याचिकाधारकांनाही वरीलपदांसाठी अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. याचिकेच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, कनिष्ठ अभियंत्यांच्या पदांचे वेगवेगळे संवर्ग तयार करण्यात आले आहेत. ह्यपदविकाधारकह्ण कनिष्ठ अभियंते हे अराजपत्रित अधिकारी अससुन ह्यपदवीधारकह्ण हे राजपत्रित अधिकारी दर्जाचे असतात. राजपत्रित आणि अराजपत्रित कनिष्ठ अभियंत्यांचे ७५ आणि २५ टक्के प्रमाण निश्चित केलेले आहे. राज्यघटनेच्या कलम ३०९ नुसार राज्य शासनाने हे नियम तयार केलेले आहेत. पदवीकाधारक आणि पदवीधारकांच्या बढतीचे नियम सुद्धा वेगवेगळे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा संदर्भ देत गिरासे यांनी वरील पदांसाठीची संवर्गनिहाय भरती योग्य असल्याचे प्रतिपादन केले. तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एखादी जाहिरात दिल्यानंतर त्यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत संपल्यानंतर जाहिरातीलच्या नियमात बदल करता येत नाहीत याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. सुनावणीअंती खंडपीठाने सर्व याचिका फेटाळल्या. गिरासे यांना अ‍ॅड. एस.के. कदम आणि अ‍ॅड.विशाल बडक यांनी सहकार्य केले.