शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
3
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
4
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
5
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
6
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
7
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
8
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
9
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
10
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
11
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
12
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
13
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
14
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
16
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
17
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
18
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
19
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
20
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

राज्यातील एकमेव काटेरी फणस कोल्हापुरात­; निरफणस वृक्षाशी साधर्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:47 IST

लवकरच शास्त्रीय नोंद होणार

- संदीप आडनाईककोल्हापूर : राज्याच्या वनस्पती कोषात नोंद नसलेला ‘ब्रेडनट’ हा वृक्ष कोल्हापूर शहरात आढळला असून, सर्वांना परिचित असलेल्या निरफणस वृक्षाशी याचे साधर्म्य आहे. याविषयी अधिक संशोधन होण्याची गरज असली तरी देशात याची ही एकमेव प्रजात असावी, असा अंदाज वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी व्यक्त केला आहे. याची लवकरच शास्त्रीय नोंद होणार आहे.‘ब्रेडनट’ या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘ॲरटोकार्पस क्रामान्सी’ असे असून, तो मोयेएसी म्हणजेच वड, फणसाच्या कुळातील आहे. हा वृक्ष सहा ते आठ मीटर उंच वाढतो. मुख्य खोडापासून अनेक फांद्या चारही बाजूंनी पसरतात. खोडात, फांद्यात पांढरा चीक असतो. नर १५ ते २० सेंमी लांब असून, खाली झुकलेला, तर मादी फुलोऱ्यात किंजे एकवटून व आसनवाढीने गुरफटलेली असते. फळ नारळाएवढे असून, त्यावर देशी फणसासारखे काटे असतात. फळांतील गर पांढरट असतो. ब्रेडनेट विदेशी वृक्ष असून, तो मूळचा फिलिपाइन्स, न्यू गिनिया, इंडोनेशियातील मालुकू बेटावरील आहे. भारतात या वृक्षाची अद्याप नोंद नाही. फळे शिजवून, भाजून किंवा तळून खातात. याची रोपे तयार होतात. कोल्हापूर शहर परिसरातील पोवारनगर, मोरेवाडी, लक्ष्मीपुरी येथे या वृक्षाचा आढळ झाला असून, तो हुबेहूब निरफणसासारखाच दिसतो.