शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्टॉल्सवर केवळ ‘रेल नीर’च का?

By admin | Updated: January 7, 2016 02:18 IST

रेल्वे प्लॅटफॉमवरील स्टॉल्समध्ये अनेक ब्रँडचे खाद्यपदार्थ विकण्याची मुभा असताना केवळ ‘रेल नीर’ या एकाच ब्रँडचे बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगी का?

मुंबई : रेल्वे प्लॅटफॉमवरील स्टॉल्समध्ये अनेक ब्रँडचे खाद्यपदार्थ विकण्याची मुभा असताना केवळ ‘रेल नीर’ या एकाच ब्रँडचे बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगी का? अशी विचारणा बुधवारी उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाकडे करत, चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.ज्या कंत्राटदारांचे आणि केटरर्सचे रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टॉल्स आहेत, त्यांना स्टॉल्सवर केवळ ‘रेल नीर’चेच बाटलीबंद पाणी उपलब्ध करावेत, असे परिपत्रक गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाने काढले. या परिपत्रकाला लोपेश वोरा या प्रवाशाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. वोरा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.अनेक ब्रँडचे खाद्यपदार्थ रेल्वे स्टॉल्सवर उपलब्ध असतात, मग पाणी का उपलब्ध नाही? तुम्ही (रेल्वे) अन्य ब्रँड्सचे पाणीही स्टॉल्सवर उपलब्ध करायला हवे. आयआरसीटीसीचे नुकसान होत आहे, असे तुमचे म्हणणे असेल, तर तिकीट बुक करणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला रेल नीरची एक बाटली मोफत द्या. प्रवाशांना ‘रेल नीर’ घेण्यासाठी प्रोत्साहित करा, अशी सूचना खंडपीठाने रेल्वेला केली. (प्रतिनिधी)