शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांना शरणागती हाच पर्याय- सतीश माथूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:22 IST

गडचिरोलीतील जंगलात रविवारी नक्षलविरोधी पथकाने दोघा कमांडरसह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.

मुंबई : नक्षलवाद्यांच्या चळवळीमध्ये नेतृत्व व गटातटावरून दुफळी निर्माण झाली असून, त्यातून अनेक अंतर्गत बाबींची इत्यंभूत माहिती आम्हाला मिळत आहे. त्यामुळे नक्षल्यांना हत्यारे खाली ठेवून शरणागती पत्करणे हाच एकमेव पर्याय उरला आहे. त्यांनी आत्मसमर्पण करून स्वत:च्या व राज्याच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी केले.गडचिरोलीतील जंगलात रविवारी नक्षलविरोधी पथकाने दोघा कमांडरसह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. राज्य पोलीस दलाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस महासंचालक माथूर म्हणाले,‘भामरागड येथील कस्नासूर जंगलात नक्षली जमल्याची माहिती मिळाल्यानंतर, पथकाने सुमारे दीड तास कारवाई करून १६ जणांना ठार केले. त्यापैकी ११ जणांची ओळख पटली असून, यांच्यावर तब्बल ७६ लाखांचे बक्षिसे जाहीर करण्यात आलेली होती. त्यातील साईनाथ उर्फ डोलेश हा पेरमिली दलमचा म्होरक्या असून, त्याच्यावर तब्बल ७५ गुन्हे दाखल होते. त्याच्याकडून एके ४७ जप्त केले आहे. २०१६ साली पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. अन्य ५ मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.नक्षली चळवळीबाबत विविध मते व्यक्त केली जात असली, तरी न्यायालयाने ज्यांना दोषी ठरविले आहे, त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सांगून माथूर म्हणाले, ‘नक्षलवाद्यांमध्ये विविध कारणांमुळे फूट पडली असल्याने, आम्हाला आता त्यांच्या हालचालींची तत्काळ(पिंक पाइट) माहिती मिळत आहे.त्यामुळे कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा शरणागती पत्करणे, हाच त्यांच्यासाठी एकमेव चांगला पर्याय आहे. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यानंतर, गेल्या ६ वर्षांत ६०५ जणांनी आत्मसर्मपण केले असून, त्यांच्या विकासासाठी ७ कोटींची मदत करण्यात आली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत जवळपास ६० नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला असून, या कालावधीत अभियानातील एकही जवानाला कोणतीही दुखापत झालेली नाही.’आता ‘फूट पेट्रोलिंग’वर भर ते म्हणाले, ‘नक्षलविरोधी अभियानामध्ये अद्यावत शस्त्रसामुग्रीचा समावेश करण्यात आला असून, जवानांना एनएसजी कमांडोकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलिसांच्या वाहनांवर हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे आता ‘फूट पेट्रोलिंग’वर भर देण्यात येत आहे.अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२६ जणांना वेगवर्धित पदोन्नती दिली असून, नुकत्याच एका अधिकाºयाला निरीक्षक पदाचे प्रमोशन दिले आहे. नक्षलवादी भागात विविध प्रकारच्या सुधारणांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, त्याला ५० कोटींपर्यंतचा निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत.’

टॅग्स :naxaliteनक्षलवादी