शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता नवी टोपी, कॉन्स्टेबल, अंमलदारांना वापरता येणार केवळ आॅनड्युटीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 20:25 IST

दीड कोटीवर मुंबईकरांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ४० हजारांवर मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता जुन्या पारंपरिक टोपी ऐवजी आकर्षक ‘कॅप’ पाहावयास मिळणार आहे.

मुंबई, दि. 24 - दीड कोटीवर मुंबईकरांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ४० हजारांवर मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता जुन्या पारंपरिक टोपी ऐवजी आकर्षक ‘कॅप’ पाहावयास मिळणार आहे. नायगाव अन्य मुख्यालयातील पोलीस कँटीनमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कॉन्स्टेबल ते सहाय्यक फौजदारापर्यंतच्या अंमलदारांसाठी ही नवी टोपी केवळ पूर्ण गणवेश व ड्युटीवर कार्यरत असताना वापरता येणार आहे.ऊन, पावसाची पर्वा न करता विविध गुुन्ह्यांचा तपास व बंदोबस्तामध्ये व्यस्त असणा-या पोलिसांना डोक्यावर बचावाबरोबरच आकर्षक व सहजतेने वापरता यावी, यासाठी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही नवी कॅपची कल्पना अंमलात आणली आहे. सध्या पोलीस कॅन्टीन तसेच नायगाव, वरळी, मरोळ, ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलाच्या (एलए) कॅन्टीनमध्ये उपलब्ध आहेत. सध्या प्रत्येक पोलिसाला केवळ एकच कॅप खरेदी करता येणार असून, दुस-या टप्प्यात आणखी नव्या टोपी मागविण्यात आल्यानंतर त्यांना आणखी एक घेता येणार आहे.नव्या कॅपसाठी ७२.९२ रुपये मोजावे लागणार असून, त्यांना दोनपेक्षा अधिक टोपी खरेदी न करण्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. अ‍ॅक्सिस बॅँकेचे एटीएम स्वॅप करून खरेदी करता येणार आहे. पोलीस खासगी ड्रेस किंवा अर्धवट गणवेशात असल्यास त्यांना ही टोपी डोक्यावर घालता येणार नाही. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कॅप वितरणाची जबाबदारी मुख्यालयातील निरीक्षक (पोलीस कल्याण ) यांच्यावर असणार असून प्रत्येक पोलीस ठाणे व शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकांनी आपल्या अखत्यारितील प्रत्येक कॉन्स्टेबलला त्याच्या वापराबाबत सूचना करावयाच्या आहेत.