प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर आहे. मोदींनी केलेल्या मोठमोठ्या वायद्यांमुळे जनतेच्या अपेक्षाही उंचावल्या. मोदी सरकार सत्तेत येताच आमूलाग्र बदल होईल, अशी आशा बाळगून असणाऱ्या जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे दिसते. सरकारचे वायदे जागीच आहेत. लोकांचा स्वप्नभंग होत असल्याचे दिसत आहे. सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला जेमतेम ४४ जागा मिळविता आल्या. मोदी सरकारला कधी एक वर्ष पूर्ण होते आणि वर्षभरातील कारभारामुळे जनतेच्या पदरी कधी निराशा पडते, याकडे काँग्रेस लक्ष ठेवून आहे. जेणेकरून अस्तित्वासाठी नव्या उभारीने संघर्ष करता येईल.आपले अस्तित्व दाखविण्यासाठी १९ एप्रिल रोजी काँग्रेसने रामलीला मैदानावरून मोदी सरकारविरुद्ध शंखनाद केला.
सरकारचे केवळ वायदे
By admin | Updated: May 9, 2015 23:52 IST