शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

एकहाती सत्तेचे फक्त इमलेच!

By admin | Updated: February 20, 2017 01:28 IST

देशातील पहिल्या १० शहरांमध्ये समावेश झालेली स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेल्या गिरणगावाला नवी ओळख प्राप्त होत असताना

राजा मानेसोलापूर : देशातील पहिल्या १० शहरांमध्ये समावेश झालेली स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेल्या गिरणगावाला नवी ओळख प्राप्त होत असताना येथे होत असलेली महापालिकेची निवडणूकही शहराच्या राजकारणाला नवी ओळख देण्याच्या तयारीला लागली आहे. संपूर्ण राज्याला लागणाऱ्या शालेय गणवेशात तब्बल ५० टक्के वाटा उचलणाऱ्या या ‘गारमेंट व युनिफॉर्म हब’चे प्रश्न जसे वेगळे आहेत तसे इथल्या मतदारांची मानसिकताही कमालीची वैविध्यपूर्ण आहे. जात आणि नात्या-गोत्यांच्या पारंपरिक विषयांबरोबरच येथे भाषा, रहिवासाचा भाग आणि उदरनिर्वाहाच्या साधनांचाही परिणाम होतो. त्याच परिणामाचा लाभ साधण्याचे कौशल्य कोण प्राप्त करतो यावरच त्याचे विजयाचे गणित ठरते.तसे वर्षानुवर्षे सोलापूर शहराचे राजकारण शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या इशाऱ्यावरच चालायचे. जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाकडे डोळेझाक करण्याच्या अलिखित करारावर तसे सोलापूरचे राजकारण आणि निर्णय पवारांनीही शिंदेंच्याच हवाली केलेले होते. शिंदेंचे विश्वासू स्व. विष्णुपंत तथा तात्या कोठे हे ‘शॅडो शिंदे’ न्यायाने शहराचे राजकारण हाताळत असायचे. काळाच्या महिम्याने शिंदेंच्या कन्या प्रणिती आणि कोठेंचे चिरंजीव महेश यांच्यातील राजकीय संघर्षाने गणित बिघडले आणि कोठे परिवार शिंदे विरोधक बनला. पुढे तात्यांच्या निधनानंतर कोठे परिवाराचा शिंदेविरोधी संघर्ष अधिकच तीव्र झाला आणि कोठे परिवार शिवसेनानिवासी झाला. हा संदर्भ काँग्रेसच्या या निवडणुकीतील राजकारणात किती रंग भरणार हे निकालच ठरवेल.आ. प्रणिती शिंदे यांनी स्वत:च्या शैलीत आक्रमक पद्धतीने केलेली शहराच्या राजकारणाची मांडणी, त्याला सुशीलकुमार शिंदे यांच्या पारंपरिक मुरब्बी राजकारणाची मिळणारी जोड हीच काँग्रेसची जमेची बाजू आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे मार्केटिंग करण्याचा नारा देत शहरात भाजप संघटन वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची पारंपरिक लिंगायत व्होट बँक आहे. तिला इतर जातीने विस्तारित करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. महेश कोठे-देवेंद्र कोठे परिवाराची व्होट बँक या मुद्दलावर शिवसेनेने आव्हान निर्माण केले आहे. कामगार चळवळीच्या प्रामाणिक बळावर कॉ. नरसय्या आडम मास्तर संघर्षाला सज्ज झाले आहेत. एमआयएम पक्षाची नक्की ताकद किती याचा अंदाज अनेक जण घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्याच गर्दीने ग्रासला आहे.आरपीआय (आ)चे नूतन प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, रिपाइं (गवई)चे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, रिपाइं (पीजी)चे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड, पीरिप (कवाडे) प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे आणि बसपाचे प्रदेश महासचिव अ‍ॅड.संजीव सदाफुले, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोकरे यांच्या माध्यमातून आंबेडकरी मते कोण कशी खेचते हेही महत्त्वाचे ठरेल.शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण आणि त्यांची टीम कोठेंच्या शक्तीत कशी भर टाकणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी दोन देशमुख आणि खा.शरद बनसोडे यांची मोट बांधून पक्षाचे बळ वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.स्मार्ट प्रश्नांची निवडणूक शहरातल्या गलिच्छ वस्त्या, नागरी सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची ओरड यावर जुजबी मलमपट्टी करणारा प्रचार सगळीकडे दिसतो. सर्वच राजकीय पक्ष स्मार्ट प्रश्नांवर आणि स्मार्ट सिटीवर मोठमोठी आश्वासने देऊन मतदारांची स्वप्ने रंगविताना दिसतात.