शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या डब्यात सोडली अवघ्या आठ दिवसाची चिमुकली, परभणीत समोर आला प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 18:29 IST

हैदराबाद-पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाडीच्या एका डब्यात अवघ्या आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक शनिवारी ( दि. १४) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सापडले़. रेल्वे पोलीस बल आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़.

ठळक मुद्दे रेल्वेतील एका कोचमध्ये दोन सीटच्यामध्ये कपड्याची झोळी करून त्यात एक स्त्री जातीचे अर्भक ठेवलेले होते़.सतर्क प्रवाशांना हे कळताच त्यांनी ही माहिती रेल्वे कर्मचा-यांना दिली़.

परभणी, दि. १५ : हैदराबाद-पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाडीच्या एका डब्यात अवघ्या आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक शनिवारी ( दि. १४) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सापडले़. रेल्वे पोलीस बल आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़.

हैदराबाद-पूर्णा ही पॅसेंजर रेल्वे गाडी शनिवारी सायंकाळी ८ च्या सुमारास गंगाखेडकडून परभणीकडे येत होती. यावेळी रेल्वेतील एका कोचमध्ये दोन सीटच्यामध्ये कपड्याची झोळी करून त्यात एक स्त्री जातीचे अर्भक ठेवलेले होते़. गाडी सिंगणापूरजवळ आल्यानंतर बेवारस स्थितीत असलेल्या या अर्भकाची माहिती काही सतर्क प्रवाशांना होताच त्यांनी ही माहिती रेल्वे कर्मचा-यांना दिली़. त्यानंतर परभणीच्या रेल्वे स्टेशन प्रबंधकांना अर्भकासंदर्भात माहिती देण्यात आली़.

रेल्वे गाडी परभणी स्थानकावर आल्यानंतर रेल्वे पोलीस फोर्सच्या कर्मचा-यांनी या अर्भकास ताब्यात घेतले व चाईल्ड लाईनच्या पथकाला पाचारण केले़. रेल्वे पोलीस बलाचे निरीक्षक उपाध्याय, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदीप बेंडसुरे, सय्यद इशरद, कृष्णा फुलारी आदींनी या चिमुकलीला ताब्यात घेऊन तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले़. आठ दिवसांच्या या चिमुकलीची प्रकृती ठणठणीत आहे व ती सुरक्षित असल्याचे चाईल्ड लाईनचे संदीप बेंडसुरे यांनी सांगितले़. या प्रकरणी अज्ञात मातेविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.  ​