शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच महाराष्ट्राचा विकास - अरुण बोंगिरवार

By admin | Updated: July 1, 2016 20:45 IST

महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे. ही बाब ध्यानात घेवूनच माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीवर लक्ष्य केंद्रीत केले होते, असे मत राज्याचे मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे वसंतराव नाईक यांच्या १०३व्या जयंती दिनानिमित्त प्रतिष्ठेच्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोंगिरवार बोलत होते. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हायला हवा, यासाठी वसंतगराव नाईक आग्रही होते. दोन वर्षात तसे झाले नाही तर फाशी घेईन, अशी घोषणाच त्यांनी केली होती. जास्त वाणाचे पीक, हायब्रीड ज्वारी उत्पादनाकडे वसंतरावांनी विशेष लक्ष्य दिले. केवळ संशोधनाच्या माध्यमातूनच प्रगतीशील आणि उन्नतीशील शेती शक्य आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळ त्यांनी राज्यात चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली, असे बोंगिरवार यांनी सांगितले. सामाईक कृषी पुरस्कारासह एकूण १२ विभागात पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाईक कृषी पुरस्कारासाठी ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. तर, उर्वरीत ११ विभागांसाठी २१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.मान्यवरांची अनुपस्थितीदरवर्षी मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत कृषी पुरस्कारांचे वितरण होते. यंदा मात्र सर्वच बड्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. यंदाचे विविध विभागातील वसंतराव नाईक कृषी पुरस्कार पुढीलप्रमाणे : सामाईक पुरस्कार (उगम फाऊंडेशन, कायर्वाह- भाई संपतराव पवार, जि. सांगली); कृषि पुरस्कार ( डॉ. एम.एस. लादानिया. संचालक, केंद्रीय लिबूंवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर); कृषी प्रक्रीया पुरस्कार (गौण वनऊपज व्यवस्थापन समिती, संचालक उल्हास कुमरे/ विजय मडवी. जि. नांदेड ); कृषी पत्रकारीता पुरस्कार ( संतोष काशिनाथ डुकरे, सल्लागार संपादक, कृषीकिंग मासिक आणि अ‍ॅप, जि. पुणे); कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार (विलास हरिभाऊ धुर्जड, जि. नाशिक); फलोत्पादन ( उन्मेष लांडे, जि.वाशिम); भाजीपाला उत्पादन ( दत्तु ढगे जि. नाशिक) ; फुलशेती उत्पादन पुरस्कार ( वृंदावन पुष्पोत्पादन संघ, अध्यक्ष- सुरेश नवसू ,जि. पालघर); वनशेती पुरस्कार (परशुराम तानू आगीवाले, जि. रायगड); पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्कार (इसाक चाऊस, जि. सांगली); जलसंधारण पुरस्कार ( लालासाहेब बापूसाहेब देशमुख, जि. लातूर); पर्यावरण संरक्षण पुरस्कार (अल्पाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशन, डॉ. अचर्ना गोडबोले, पुणे)