शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या खात्यांत केवळ ४३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 04:05 IST

ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यांत केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये एवढी रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे  - ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यांत केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये एवढी रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे़गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके दाम्पत्याला अटक केली होती़ त्यानंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. डी़ एस़ कुलकर्णी यांची पुणे, मुंबई येथील कार्यालये, घरे यांवर छापे घालून आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्याच वेळी त्यांची विविध बँकांमध्ये असलेली २७५ खाती गोठवली होती़ या बँक खात्यांत मोठी रक्कम शिल्लक असेल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. डीएसके यांच्याविरोधात आतापर्यंत ५ हजारांपेक्षा अधिक तक्रारदारांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत.डीएसके यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे़ त्यांनी डीएसके यांच्या बँक खात्यांची तपासणी करून पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्ट नुकताच सादर केला़ त्यानुसार या सर्व बँक खात्यांत मिळून केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली असल्याचे सहायक पोलीस आयुक्त न्ीालेश मोरे यांनी दिली़मालमत्ता लिलावाची प्रक्रिया सुरू होणारपोलिसांनी डीएसके यांच्या ७ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत़ याशिवाय त्यांच्या मालमत्तांची यादी करून लिलावाच्या प्रक्रियेसाठी महसूल विभागाकडे पाठविली आहे़ महसूल विभागाने २४६ मालमत्तांचा प्रस्ताव तयार करून त्याची अधिसूचना काढण्यासाठी गृह खात्याकडे सादर केला आहे़ ही अधिसूचना निघाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्ता लिलावाची प्रक्रिया सुरू होणार आहे़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालय