शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

अवघ्या १८ टक्के लाचखोरांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 02:20 IST

लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत (एसीबी) न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये राज्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे. कॉमनवेल्थ ह्युमन

- राजेश निस्ताने, यवतमाळलाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत (एसीबी) न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये राज्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे. कॉमनवेल्थ ह्युमन राईटस् इनिशिएटीव्ह (सीएचआरआय) आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २००१ ते २०१५ या काळात देशभरात दाखल फौजदारी स्वरूपाचे एकूण गुन्हे आणि त्या तुलनेत भ्रष्टाचाराच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा सखोल अभ्यास केला. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.राज्यात गेल्या १५ वर्षांत विविध प्रकारच्या फौजदारी स्वरूपाचे एकूण ५२ लाख १५ हजार ४८९ गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविले गेले. त्यात एसीबीमार्फत लोकसेवकांविरुद्ध नोंदविल्या गेलेल्या गुन्ह्यांची संख्या केवळ ८ हजार ८७५ एवढी आहे. एकूण दाखल फौजदारी गुन्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ०.१७ टक्का इतके अत्यल्प आहे. दाखल गुन्ह्यांपैकी ६ हजार ३९९ गुन्ह्यांची न्यायालयीन सुनावणी (ट्रायल) पूर्ण झाली आहे. यापैकी केवळ १ हजार ५९२ गुन्हेन्यायालयात सिद्ध होऊ शकले.गुन्हे शाबितीचे हे प्रमाण १७.९४ टक्के आहे. उच्च न्यायालयातील अपिलात तर हे प्रमाण आणखी घटले आहे.८२ टक्के खटल्यात सबळ पुराव्याअभावी लोकसेवक निर्दोष सुटले असून हे एसीबीच्या तपासातील अपयश मानले जाते.पंच-साक्षीदार फितूर होणे, फिर्यादीच उलटणे, दोषारोपपत्राला परवानगी देणारा उच्च पदस्थ अधिकारी खटल्याच्या वेळी साक्ष देण्यासाठी न्यायालयापुढे हजर नहोणे याबाबींचाही या निर्दोष मुक्ततेला हातभार लागतो आहे. कायद्यातील पळवाटांचा लाभ हे लोकसेवक निर्दोष मुक्ततेसाठी उठवित असल्याचे दिसून येते.भ्रष्टाचारात महाराष्ट्र आघाडीवरया १५ वर्षांच्या काळात एसीबीने लोकसेवकांविरुद्ध दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या फौजदारी गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांवर आहे. राज्यात ८ हजार ८७५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याखालोखाल र२ाजस्थान (६३९३ गुन्हे), ओडिशा (५०८५ गुन्हे), कर्नाटक (४७३२ गुन्हे), आंध्र प्रदेश (३८०४ गुन्हे), मध्य प्रदेश (३३४४ गुन्हे), तामिळनाडू (३२६१ गुन्हे ), पंजाब (३१७१ गुन्हे), गुजरात (३१४८ गुन्हे) तर केरला टॉपटेनमध्ये १० व्या क्रमांकावर असून तेथे २४६४ गुन्हे नोंदविले गेले आहेत.देशातील प्रमाण १९.५३ टक्के सीएचआरआय आणि एनसीआरबीच्या पाहाणीनुसार या १५ वर्षांत देशभरात फौजदारी स्वरूपाचे ९ कोटी ११ लाख १५ हजार ३३४ गुन्हे नोंदविले गेले. त्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लोकसेवकांविरुद्ध नोंदविल्या गेलेल्या गुन्ह्यांची संख्या ५४ हजार १३९ एवढी असून हे प्रमाण ०.०६ टक्का एवढे अत्यल्प आहे. यापैकी भ्रष्टाचाराच्या २९ हजार ९२० गुन्ह्यांची सुनावणी न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यातील केवळ १० हजार ५७१ गुन्हे सिद्ध होऊन आरोपींना शिक्षा दिली गेली. हे प्रमाण १९.५३ टक्के एवढे आहे. अपिलात तर हे प्रमाण आणखी घटले आहे.मुंबईमध्ये निर्दोष मुक्ततेचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्रात कमी आहे. प्रत्येक खटल्यात निर्दोष मुक्ततेची कारणे वेगवेगळी असतात. तपासातील त्रुटीही असू शकतात. मात्र ती नेमकी कारणे आधी तपासावी लागतील. - बिपीनकुमार सिंग,अपर पोलीस महासंचालक,अ‍ॅन्टी करप्शन, मुंबई