पंढरीनाथ गवळी - भुसावळ
भारतात 65 टक्के ऊज्रेची गरज कोळशाद्वारे पुरविली जाते. वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर उत्खनन सुरू आहे. उपलब्ध कोळसा खाणी 132 वर्षार्पयतच सुरू राहतील. त्यानंतर कोळसा संपलेला असेल. यासाठी जगाला ऊज्रेच्या पर्यायासाठी दुसरा पर्याय निवडावा लागणार आहे.
देशात एकूण दोन लाख 3क् हजार मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यासाठी कोळसा खाणीतून उत्खनन सुरू आहे. उत्खननाचा हा दर पाहता ऊर्जानिर्मितीसाठी लागणारा कोळसा केवळ 132 वर्षे पुरेल इतकाच असल्याची माहिती आहे.
भारतातील कोळसा भारतात प. बंगाल, ओरिसा, बिहार आणि झारखंड, आंध्र प्रदेश या प्रांतामध्ये कोळशाच्या खाणी आहेत.
229.251 जीडब्लू (23क् लाख मेगाव्ॉट) वीजनिर्मितीसाठी 35 लाख मे.टन कोळसा दर दिवशी लागतो.
ऊर्जा क्षेत्रतील तज्ज्ञांनुसार देशात वीजनिर्मितीतून जे उत्पन्न मिळते त्यातील 8क् टक्के पैसा कोळसा खरेदीवर खर्च होतो. त्यामुळे आपल्याकडे वीज वापर आणि ती पुरवण्यावर मर्यादा आहेत, अशा स्थितीत केंद्राकडून ग्राहकांना 5क् टक्के सबसीडी देणो ही बाब वीज क्षेत्रतील तज्ज्ञांच्या विचारक्षमतेच्या पलीकडची आहे. यापासून मिळते ऊर्जा : जगाची ऊज्रेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी नवीन उपाय शोधले जात आहेत.
कोळसा, पाणी, सौर, गॅस
आणि वारा (हवा) याद्वारे जगभर वीजनिर्मिती केली जाते. कोळशाद्वारे तब्बल 65 टक्के ऊज्रेची निर्मिती होऊन विजेची गरज भागविली जाते. अलीकडेच जपान सरकारने समुद्रातून फायर आइस शोधून काढले आहे. त्याचा वीजनिर्मितीसाठी पर्याय म्हणून वापर करण्याची त्यांची योजना आहे. असे झाल्यास कोळशाला पर्याय निर्माण होऊ शकेल, असे तज्ज्ञांना वाटते.