मुंबई : राज्यातील पाच विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये केवळ एक किंवा दोनच विद्यार्थी आहेत, तर १५१ विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये २ ते १० एवढेच विद्यार्थी असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. या महाविद्यालयांबाबतचा अहवाल संबंधित विद्यापीठांकडून मागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याबाबतचा प्रश्न संजय सावकारे आदी सदस्यांनी विचारला होता. बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवनपुणे येथील बालचित्रवाणी या संस्थेचे पुनरुज्जीवन पीपीपी तत्त्वावर (पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप) करण्याचा विचार केला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. या संस्थेतील कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याबाबतचा मूळ प्रश्न योगेश टिळेकर यांनी विचारला होता. या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या कार्यालयाला मिळणाऱ्या महसुलातून केला जात होता. तो बंद झाल्याने अडचणी आल्या आहेत. आता हे वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, असे तावडे यांनी सांगितले. तसेच, बालचित्रवाणीचे कर्मचारी व स्थानिक लोक प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल. (विशेष प्रतिनिधी)
१५१ महाविद्यालयांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी !
By admin | Updated: April 6, 2015 23:07 IST