शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील जागांच्या आरक्षणाची माहिती आता आॅनलाइन

By admin | Updated: June 10, 2016 05:30 IST

विकास नियोजन आराखडा १९९१ मध्ये संबंधित जागा कशासाठी आरक्षित होती, याची माहिती आता आॅनलाइन मिळणार आहे़

मुंबई : विकास नियोजन आराखडा १९९१ मध्ये संबंधित जागा कशासाठी आरक्षित होती, याची माहिती आता आॅनलाइन मिळणार आहे़ यामुळे नव्या इमारतीमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती ग्राहकांना पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे़ प्रत्येक सीटीएस क्रमांकासाठी ग्राहकांना दोन हजार रुपये मोजावे लागणार आहेत़ ही माहिती मिळवण्यासाठी टेबलाखालून होणाऱ्या व्यवहारांना आळा बसणार आहे़१९९१ ते २०११ या २० वर्षांतील विकास नियोजन आराखड्याची जेमतेम २० टक्के अंमलबजावणी झाली आहे़ त्यामुळे या विकास आराखड्यातील आरक्षणे कायम ठेवून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे़ ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस’ अंतर्गत पालिकेने नव्या इमारतींच्या आराखड्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे़ त्यामुळे सीटीएस क्रमांकाची आॅनलाईन नोंद केल्यास त्या भागातील जागांचे १९९१ मधील आरक्षण कळू शकणार आहे़यामध्ये निवासी, व्यावसायिक झोन, रेल्वे, विमानतळ, संरक्षण विभाग, रस्ते, शाळा, रुग्णालये आदी माहितीचा समावेश असेल़ त्यामुळे नवी इमारत उभी राहत असताना ही आरक्षणे कुठे टाकली होती, याची माहिती सीटीएस क्रमांकावरुन आॅनलाईन मिळवता येईल़ याचा फायदा विकासक आणि ग्राहक दोघांनाही होणार आहे़ मात्र यासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत़ असा थांबेल गैरव्यवहारही आरक्षणे शोधण्यासाठी यापूर्वी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागत होता़ यामुळे ग्राहकांची अडवणूक व ही माहिती मिळवण्यासाठी इमारत प्रस्ताव व विकास नियोजन खात्यात टेबलाखालचे व्यवहार राजरोस चालत होते़ मात्र, आता दोन हजार रुपयांमध्ये सीटीएस क्रमांकावर कोणते आरक्षण आहे हे आॅनलाईन मिळणार असल्याने अशा गैरव्यवहाराची शक्यता राहणार नाही़ मात्र पूर्वी ३००-५०० रुपयांत १५ दिवसांमध्ये मिळणारी ही माहिती काही वेळेत मिळवण्यासाठी ग्राहकांना दोन हजार रुपये मोजावे लागतील़ (प्रतिनिधी)पाहणीनंतरच ताबा प्रमाणपत्र इमारतींना जलद परवानगी मिळावी, यासाठी पालिकेने प्रक्रिया सुटसुटीत केली आहे़ परवानग्यांचे प्रमाण निम्म्यावर आणण्यात आले आहे़ मात्र इमारतीला ताबा प्रमाणपत्र देण्यापूर्वी प्रत्यक्ष जाऊन इमारतीची पाहणी पालिका करणार आहे़ विकासकाने नियमांचे पालन केले नसल्याचे या पाहणीतून उजेडात आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़अशी मिळेल माहिती पालिका प्रत्येक इमारतीला जीआयएस टॅगिंग करणार आहे़ त्यामुळे जुन्या किंवा प्रस्तावित इमारतीची माहिती सर्वसामान्यांनाही मिळू शकणार आहे़ या इमारतीवर टॅग केल्यानंतर संपूर्ण माहिती उपलब्ध होईल़ या माहितीद्वारे ग्राहक प्रस्तावित इमारतीच्या परवानगीबाबतची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावरुन पाहू शकतील़ मात्र ही माहिती मिळवण्यासाठी ग्राहकाला त्या इमारतीच्या वास्तुविशारदाचे नाव, नगर भूमापन क्रमांक, नस्ती क्रमांक अशी माहिती असणे आवश्यक आहे़