शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

मराठी भाषेसाठी ऑनलाइन चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 02:18 IST

राजकीय पक्षांमुळे सर्वसामान्य मराठी माणूसही दुकानांच्या पाट्या देवनागरीत अ

साधना गोरे

‘स्क्रीनवाचना’च्या आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेची चळवळही मागे नाही. ‘मराठी प्रथम’ हे मराठी अभ्यास केंद्र या मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या संस्थेचे डिजिटल नियतकालिक आहे. ‘ओळख भाषेची - मराठी महाराष्ट्राची’ असे मराठी प्रथमचे घोषवाक्य असून, मराठी भाषेशी निगडित - मराठी शाळा, उच्च शिक्षणातील मराठी, न्यायालयीन मराठीचा वापर, माहिती - तंत्रज्ञान, प्रशासनातील मराठीचा वापर, भाषाविज्ञान आदी विषयांसंबंधी अभ्यासपूर्ण लेख, असे वाचन, ज्ञानाची भूक भागवत मराठीचा प्रचार, प्रसार करणारे बरेच काही येथे वाचायला मिळते.

राजकीय पक्षांमुळे सर्वसामान्य मराठी माणूसही दुकानांच्या पाट्या देवनागरीत असणे, यालाच मराठीकरण समजायला लागला आहे, पण एखाद्या भाषेचा विकास करायचा मूलभूत मार्ग त्या भाषेतील शाळांच्या संख्येवर, शाळांच्या सक्षमीकरणावर अवलंबून असतो, या भाषातज्ज्ञांच्या इशाºयाकडे आपण सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत आहोत, हे टाळायला हवे. मराठी शाळांमधील प्रयोगशील उपक्रमांचे आदानप्रदान घडवून आणण्यासाठी शिक्षणविषयक लेखांना मराठी प्रथममध्ये प्राधान्य दिले जाते. सोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये साजºया केल्या जाणाºया मराठीविषयक कार्यक्रमांचे वृत्तान्त, मराठीचा आग्रह धरणारे किस्से, राज्य सरकार - केंद्र सरकार यांची अनेक आस्थापने, खासगी संस्था, कंपन्या इ. ठिकाणी मराठीला डावलले जाणारे,त्याविरुद्ध जाब विचारणारे अनुभव येथे वाचायला मिळतात.मराठीची चळवळ, मराठी भाषेच्या संवर्धनाचे, अन्याय निर्मूलनाचे कार्य करणारे राज्यभरातील कार्यकर्ते मराठी प्रथमचा आधार आहे. मराठी भाषेच्या चळवळीतील हे विखुरलेले बिंदू जोडून त्यांची एक सशक्त साखळी करण्याचा मानस असल्याचे ‘मराठी प्रथम’चे संपादक ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांनी सांगितले.मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा आणि राजभाषा असली, तरी आजही ती ज्ञानभाषा नाही. मात्र, आपल्या सामूहिक व अविरत प्रयत्नांतून मराठी ज्ञानभाषा होऊ शकते. त्यासाठी तिचे सामाजिक, शैक्षणिक स्थान प्रथम भाषेचेच असले पाहिजे. मराठी आपल्यासाठी आज, उद्या आणि निरंतर प्रथम भाषाच असेल, असली पाहिजे. बाकी सर्व भाषा आपल्यासाठी कमीअधिक महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांचे स्थान कायम दुसºया क्रमांकाचे असायला हवे, अशी ‘मराठी प्रथम’ची भूमिका असून हीच भूमिका प्रत्येक मराठी माणसाचीही असायला हवी.मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा आणि राजभाषा असली, तरी आजही ती ज्ञानभाषा नाही. मात्र, आपल्या सामूहिक व अविरत प्रयत्नांतून मराठी ज्ञानभाषा होऊ शकते. त्यासाठी तिचे सामाजिक, शैक्षणिक स्थान प्रथम भाषेचेच असले पाहिजे, इतर भाषांचे स्थान कायम दुसºया क्रमांकाचे असायला हवे, हीच भूमिका प्रत्येक मराठी माणसाची असायला हवी.(लेखिका मराठी अभ्यास केंद्रात कार्यकर्त्या आहेत)