शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन लॉटरी सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:14 IST

राज्याची आॅनलाइन लॉटरी पुढील चार महिन्यांत सुरू होईल, असे आश्वासन लॉटरी आयुक्त अमित सैनी यांनी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेला दिल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी केला आहे

मुंबई : राज्याची आॅनलाइन लॉटरी पुढील चार महिन्यांत सुरू होईल, असे आश्वासन लॉटरी आयुक्त अमित सैनी यांनी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेला दिल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी केला आहे.विक्रेता सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच सैनी यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी आश्वासित केल्याचे वारंग यांनी सांगितले. या भेटीवेळी विक्रेता सेनेचे प्रमुख मार्गदर्शक व आमदार सुनील शिंदे यांनी लॉटरीवर लादलेला २८ टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) कमी करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात शिंदे यांच्यासह विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग, खजिनदार अविनाश सावंत, मुंबई शहर लॉटरी संपर्क प्रमुख संतोष तोडणकर व मुंबई उपनगर लॉटरी संपर्क प्रमुख संदीप महिदा उपस्थित होते. राज्याची हक्काची लॉटरी नसताना बाहेरील लॉटरीवर २८ टक्के जीएसटी लादल्याने स्थानिक विक्रेते उद्ध्वस्त झाल्याचे विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी बैठकीत सांगितले.वारंग म्हणाले की, सुमारे ८० टक्के विक्रेत्यांची दुकाने बंद झाली आहेत. तर उरलेली दुकाने लॉटरी प्रतीक्षेत बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शक्य तितक्या लवकर राज्याने स्वत:ची आॅनलाइन लॉटरी जाहीर करून कमीतकमी जीएसटी आकारावा. त्यावर आयुक्त अमित सैनी यांनी सकारात्मक आश्वासन दिले. सरकारचे शिष्टमंडळ आॅनलाइन लॉटरीची पूर्ण माहिती घेण्यासाठी गोव्यामध्ये गेल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील चार महिन्यांत आॅनलाइन लॉटरी सुरू करण्याची ग्वाही सैनी यांनी दिल्याचे वारंग यांनी स्पष्ट केले.