शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

अब्जाधीश प्रतिष्ठितांना आॅनलाइन गंडा

By admin | Updated: August 21, 2016 20:59 IST

तज्ज्ञ डॉक्टर आणि उच्चशिक्षितांच्या बँक खात्यातील रक्कम काढून त्यांना लाखो रुपयांनी आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला

सचिन राऊत/ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 21 - शासकीय सेवेत मोठ्या हुद्द्यावरील उपजिल्हाधिकारी,पत्रकार, अन्यायापासून संरक्षण करणाऱ्या पोलिसासह अस्थीरोग तज्ज्ञ डॉक्टर आणि उच्चशिक्षितांच्या बँक खात्यातील रक्कम काढून त्यांना लाखो रुपयांनी आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. बँक खाते आॅनलाइन करण्यासोबतच ते बंद होणार नाही याची दक्षता म्हणून बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या एटीएम कार्डवरील १६ अंकी डिजिटल आकडा आणि सीव्हीव्ही क्रमांक घेऊन या लब्धप्रतिष्ठितांच्या बँक खात्यातून रक्कम काढण्यात आली आहे. सामान्य नागरिक तर गंडविल्या जातातच पण या लब्धप्रतिष्ठितांना गंडविल्याने शहरात एकच चर्चा सुरू आहे.अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकाऱ्यांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून खाते बंद न होण्यासाठी एटीएम कार्डच्या मागे असलेला १६ अंकी डिजिटल आकडा आणि सीव्हीव्ही क्रमांक विचारण्यात आला. त्यांनीही बँकेतून फोन असल्याचा विश्वास ठेवत हा आकडा सांगितला; मात्र त्यांना काही कळायचा आतच बँक खात्यातील २५ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढण्यात आली. असाच प्रकार एका मोठ्या हिंदी वर्तमानपत्रात कार्यरत असलेल्या वरिष्ठ उपसंपादकासोबत घडला. त्यांच्या बँक खात्यातूनही २८ हजार रुपये अशाच प्रकारे काढण्यात आले. अकोल्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ यांच्याही खात्यातून तब्बल एक लाख ४८ हजार रुपये बँकेतून बोलत असल्याच्या नावाखाली काढण्यात आले. त्यांनीही फोनवर सीव्हीव्ही क्रमांक आणि १६ अंकी डिजिटल आकडा समोरच्याला सांगितला होता. यासोबतच अकोला जिल्हा पोलीस दलात वायरलेस विभागातील पोलीस कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातूनही ३० हजार रुपये काढण्यात आले. अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला १ लाख २८ हजार रुपयांनी अशाच प्रकारे गंडविले. तर गोरक्षण रोडवरील रहिवासी असलेले आणि विदेशात ओमान येथे नोकरीवर असलेल्या एका युवकाने भावाच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी पाठविलेले ४ लाख ९६ हजार रुपयेही बँक खात्यातून परस्पर काढण्यात आले. बँक खाते आॅनलाईन करण्याच्या नावाखाली आणि बँक खाते बंद होणार असल्याने एटीएम कार्डवरील १६ अंकी डिजिटल आकडा व सीव्हीही क्रमांक विचारून ही फसवणूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र त्यानंतरही अनेक उच्चशिक्षितांना हा क्रमांक फोनवर विचारून आर्थिकदृष्ट्या गंडविल्या जात आहे.महाराष्ट्र इझी टार्गेटएटीएम कार्डवरील १६ अंकी आकडा आणि सीव्हीही क्रमांक महाराष्ट्रातील नागरिक सहजरीत्या सांगतात. त्यामुळे ह्यहॅकर्सह्णच्या लेखी महाराष्ट्र इझी टार्गेट असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. बँक खाते बंद करणे आणि बँक खाते आॅनलाइन करणे एवढ्या छोट्या बाबीला बळी पडत महाराष्ट्रातील नागरिक सर्वच माहिती अतिशय सहज देत असल्याने त्यांची फसवणूक करणे सोपे असल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. मोडस आॅपरेंडी एकचबँक खात्यातून पैसे काढणाऱ्या टोळीची मोडस आॅपरेंडी एकच असल्याचे तक्रारदार समोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. उपजिल्हाधिकारी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर, पोलीस, पत्रकार आणि उच्चशिक्षितांना फसविण्यासाठी केवळ बँक खाते बंद होणार असून त्यासाठी एटीएम कार्डवरील क्रमांक मागण्यात आला आहे. यासोबतच खाते आॅनलाइन करण्याचे सांगताच या सर्वांनी माहिती फोनवर दिल्याचे उघड झाले आहे. ४५ मिनिटांत ५ लाख गायबगोरक्षण रोडवरील एक युवक ओमान येथे नोकरीसाठी आहे. या युवकाच्या भावाचा पुणे येथे अभियांत्रिकी प्रवेश असल्याने त्याने ४ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम भावाच्या बँक खात्यात टाकली. ही रक्कम ५ वाजून १२ मिनिटांनी सदर युवकाच्या बँक खात्यात आल्यानंतर ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत या खात्यातून तब्बल ४ लाख ९६ हजार रुपये काढण्यात आले होते. ही रक्कम एटीएमवरील क्रमांक घेऊनच काढण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून करण्यात येत आहे.दिल्ली आणि छत्तीसगढमध्ये तपासअकोल्यातील या दिग्गजांच्या बँक खात्याच्या नावाखाली आॅनलाईन पैसे काढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सायबर सेलकडून करण्यात येत आहे. या पथकाने दिल्ली आणि छत्तीसगढ गाठून तपास केला. दिल्ली पोलिसांचीही मदत घेतली; मात्र दिल्ली पोलिसांनी संपूर्ण देशातील पोलीस अशाच प्रकारच्या गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्लीत येत असल्याचे सांगितले; मात्र अद्याप एकाही गुन्ह्याचा छडा लागला नसल्याचे समोर आले आहे. दिग्गजांना असा बसला फटकाप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ - १ लाख ४८ हजारउपजिल्हाधिकारी - २५ हजार रुपयेकारागृहातील पोलीस - १ लाख २८ हजारओमान येथील युवक - ४ लाख ९६ हजारवायरलेस विभागातील पोलीस - ३० हजारवरिष्ठ पत्रकार - २८ हजारसेवानिवृत्त जवान -८० हजार