- योगेश बिडवई ।मुंबई : जुलैमध्ये शेतक-यांकडून कमी भावाने खरेदी केलेला कांदा परराज्यात अधिक दराने विकून नफेखोरी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापा-यांनी भाव वाढविल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शेतकरी अन् ग्राहक दोन्ही वेठीला धरले गेले. संबंधित व्यापारी प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आहेत.शेजारच्या राज्यांत पुरामुळे कांद्याचे नुकसान झाल्यानंतर लासलगाव व पिंपळगावच्या व्यापाºयांनी पुरवठा खूपच कमी झाल्याचे चित्र निर्माण केले. त्यानुसार २५ जुलैनंतर भाव अचानक वाढण्यास सुरुवात झाली. आॅगस्टमध्ये क्विंटलचे सरासरी भाव दोन हजारांच्या वर होते. त्यामुळे छोट्या व्यापाºयांना एवढा महाग कांदा खरेदी करणे शक्य नव्हते. काही ठरावीक व्यापाºयांनीच या काळात खरेदी केली. विशेष म्हणजे या व्यापाºयांकडे ५०० ते ९०० रुपये दराने खरेदी केलेला ५० हजार क्विंटलपर्यंतचा माल पडून होता. तो त्यांनी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक भावाने परराज्यात विकला....मग भावकमी झाले कसे?देशभर मागणी वाढल्याचे व्यापारी सांगत असताना सप्टेंबरमध्ये भाव कमी कसे होत गेले, असा सवाल उपस्थित होत आहे. कमी दराने खरेदी केलेला माल विकल्यानंतर व्यापाºयांनी ११ आॅगस्टनंतर पुन्हा भाव पाडण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते.असे वाढले भाव!(स्रोत : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)महिना सरासरी भाव (प्रतिक्विंटल/रुपये)३ जुलै ५४११७ जुलै ५७०३१ जुलै १,३४०१० आॅगस्ट २,४५०३१ आॅगस्ट १,९००१३ सप्टेंबर १,४३०
नफेखोरीसाठी कांद्याचे दर वाढविले; व्यापारी रडारवर, ग्राहक अन् शेतकरी वेठीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 03:07 IST