शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदानाची योजना ठरली मृगजळ

By admin | Updated: October 20, 2016 20:25 IST

२० हजार क्विंटलची कांदा विक्रीच पात्र ठरविण्यात येणार आहे. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गणेश मापारी खामगाव, (जि.बुलडाणा), दि. २० : केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याची अट बुलडाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख क्विंटलच्या जवळपास कांदा विक्री केली असून अनुदानासाठी मात्र केवळ २० हजार क्विंटलची कांदा विक्रीच पात्र ठरविण्यात येणार आहे.कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जुलै व आॅगस्ट २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रतिक्विंटल १०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान पणन संचालकांनी सर्व बाजार समित्यांकडून १ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील कांदा विक्रीची माहिती घेतली. बाजार समित्यांकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेली माहिती आणि पणन संचालकांकडे जुलै-आॅगस्टमध्ये आलेली आॅनलाईन माहिती यामध्ये बराच घोळ आहे. त्यामुळे पणन संचालकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना पुन्हा माहिती पाठविण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सदर माहिती प्रमाणित करुन मागविण्यात आली आहे.

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याची माहिती २० आॅक्टोबर रोजी पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी केवळ नांदुरा आणि मलकापूर या दोन बाजार समित्यांमध्येच कांदा खरेदी केली जाते. त्यामुळे शासकीय अनुदानासाठी या दोन बाजार समित्यांमधील कांदा विक्रीच पात्र ठरविल्या जाणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख क्विंटलच्या जवळपास कांदा उत्पादन झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. आणि अनुदानासाठी मात्र २० हजार क्विंटल कांदाच पात्र ठरणार असून हजारो शेतकऱ्यांपैकी नांदुरा आणि मलकापूर बाजार समितीत कांदा विक्री करणाऱ्या १ हजार ८६६ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी बाजार समिती व्यतिरिक्त कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा कोणताही लाभ होणार नाही.सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी मदतकांदा अनुदान देण्यासाठी शासनाने सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बाजार समितीच्या बाहेर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. कांदा लागवडीच्या सात-बाऱ्यावरील नोंदीवरुन किंवा तलाठ्यांकडून माहिती घेवून शासनाने सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.