बारामती : पावसाने ओढ दिल्याने चिंताग्रस्त शेतक:याला यंदा कांदा रडविण्याची चिन्हे दिसत आहेत. जून महिना संपत आला आहे. मात्र, पावसाने अद्याप पाठ फिरवलेली आहे. परिणामी, पावसावर अवलंबून असलेल्या सर्वच पिकाच्या पेरण्या लांबलेल्या आहेत. त्याला कांदादेखील अपवाद नाही. यंदा लागणच उशीर होत असल्याने कांदा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे संकेत आहेत.
बारामतीचा जिरायती भाग कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील अर्थव्यवस्थेत कांदा पिकाचे स्थान महत्त्वाचे आहे.
खरिपाच्या हंगामात घेतल्या जाणा:या ‘हळवा ’कांद्याला लागवडीसाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. बियाणो लागवडीचा हा कालावधी आहे. तर, रोपे लागवड केल्यानंतर हाच कालावधी कमी होतो. पावसाने पाठ फिरवल्याने हे चित्र बदलले आहे. पाण्याअभावी कांद्याची अपेक्षित रोपनिर्मिती झालेली नाही. तर, बाजारातील उपलब्ध असलेली रोपे चढय़ा दराने विक्री होण्याची
भीती आहे.
जिरायती भागात हळवी, गरवी कांद्याची लागवड केली जाते. त्यापैकी खरीप हंगामात मे-जून महिन्यात हळवी कांद्याची लागवड केली जाते. त्यासाठी बियाणो, रोपांचा पर्याय निवडला जातो. सध्या पाणी नसल्याने रोपांचा तुटवडा भासणार आहे. लागवड लांबल्याने उत्पादित तयार कांदा बाजारात उशिरा येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव चढे असणार आहेत. रोपे उपलब्ध नसल्याने शेतकरीवर्ग त्रस्त आहे. बियाणो लागवड करूनच कांदा उत्पादन घ्यावे लागणार आहे. यातून ग्राहकांना यंदा कांदा रडवणार, हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)
बियाणांचे दर 1क् ते 2क् टक्क्यांर्पयत वाढणार
4बियाणांचे दर मात्र वेगवेगळे आहेत, बियाणांचे दर मागील वर्षी प्रतिकिलो 12क्क्-13क्क् होते. यंदा हे दर प्रतिकिलो 138क् ते 285क् र्पयत आहेत. या दरांमध्ये पावसानंतर 1क् ते 2क् टक्क्यांर्पयतची वाढ होण्याची शक्यता कृषीसेवा केंद्राचे चालक सचिन सस्ते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.