शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना रडवतोय कांदा

By admin | Updated: August 27, 2016 05:04 IST

गतवर्षी ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या कांद्याने या वर्षी शेतकऱ्यांना रडविले आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- गतवर्षी ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या कांद्याने या वर्षी शेतकऱ्यांना रडविले आहे. प्रत्येक राज्यात बाजारभाव ६ ते ७ पट घसरले आहेत. गतवर्षी २० ते ८० रुपयांना विकला जाणारा कांदा या वर्षी अन्य राज्यांत २ ते २० रुपये व महाराष्ट्रात १ ते १० रुपये किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला व फळे नियमनमुक्त केली आहेत. परंतु हा निर्णय घेऊन दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच कांद्याचे बाजारभाव गडगडले आहेत. प्रत्येक वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढतात. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मार्चपासून शक्य तेवढा माल चाळींमध्ये ठेवतात. गतवर्षी कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता. महाराष्ट्रात होलसेल मार्केटमध्ये २० ते ६२ रुपये किलो भाव मिळत होता. देशातील सर्वच राज्यांत दर २० ते ८० रुपयांपर्यंत गेले होते. परंतु या वर्षी बाजारभाव प्रचंड घसरले आहेत. १० वर्षांत प्रथमच आॅगस्टमध्ये कांद्याचे दर १ ते १० रुपये एवढे खाली आहेत. शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन करण्यासाठी व मार्चपासून चाळींमध्ये साठवणूक करण्यासाठी केलेला खर्चही निघत नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. दोन महिन्यांपासून कांद्याचे दर घसरू लागले आहेत. याविषयी व्यापारी व शेतकरी प्रतिनिधी वारंवार आवाज उठवत असतानाही शासनाने योग्य कार्यवाही केलेली नाही. सप्टेंबर अखेरपासून नवीन कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारभाव वाढण्याऐवजी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. >शेतकरी नेते गप्प का ?राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे राज्याचे पणन राज्यमंत्री आहेत. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.