ठाणे : पदाचा गैरवापर करून भ्रष्ट मार्गाने दोन हजार मिळवल्याप्रकरणी ठाण्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ विभागाचा लाइनमन विजयन नायडूला दोषी ठरवून ठाणे विशेष न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.नायडू हा ठाण्यातील खारटन रोड येथे कार्यरत असताना त्याने १३ डिसेंबर २००५ रोजी स्पेअरमधून इलेक्ट्रीक साहित्य पुरवून पदाचा गैरवापर क रून दोन हजारांचा लाभ मिळवला होता. याप्रकरणी त्याच्यावर ठाणेनगर पोलीस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाला. विशेष न्यायालयात याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल केली होती.
‘एमएसईबी’च्या लाइनमनला एक वर्षाची शिक्षा
By admin | Updated: September 7, 2015 00:57 IST