शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग समुद्रात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला; शोध मोहीम सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 15:39 IST

अलिबागच्या समुद्रामध्ये बुडालेल्या दोन जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून बुडालेल्या दुसऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे.

ठळक मुद्देअलिबागच्या समुद्रामध्ये बुडालेल्या दोन जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून बुडालेल्या दुसऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे. कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना बुडून बेपत्ता झाले होते.

- जयंत धुळप

अलिबाग, दि. 16- अलिबागच्या समुद्रामध्ये बुडालेल्या दोन जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून बुडालेल्या दुसऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना बुडून बेपत्ता झालेल्या दोन पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. सौरभ खान (23) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३०वाजता नैसर्गीक भरतीच्या वेळी तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सापडला. तर दुसऱ्या व्यक्तीचा अजूनही शोध सुरू आहे.

बेपत्ता असलेल्या ऋषभ सिव्हा (24, सध्या रा.रसायनी,मुळ रा.गोवा) याच्या शोध घेण्यासाठी अलिबाग कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या सहकार्याने कुलाबा किल्ला परिसरात शोध मोहीम सुरु असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. मृत सौरभ खान हा मुळचा मध्यप्रदेशातील रतलामचा राहणारा असून, त्याचे नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्याकरीता येथील जिल्हा रुग्णालयात पोहचले आहेत. शवचिकीत्सा प्रक्रीयेअंती मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती वराडे यांनी दिली आहेय 

सांगूनही त्यांनी ऐकलं नाहीरसायनीमधील डेकोर होम कंपनीमध्ये सिव्हील इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले पाच मित्र मंगळवारी अलिबाग समुद्र किनारी फिरायला आले होते. त्यामध्ये हेबल अभिराम प्रधान,उरप प्रताप मिश्रा, सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा यांचा समावेश होता. यापैकी सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा  हे तिघं जण कुलाबा किल्ला पाहण्याकरीता ओहोटीच्यावेळी किल्ल्यात गेले होते तर अभिराम प्रधान व उरप प्रताप मिश्रा हे दोघं अलिबाग किनाऱ्यांवरच थांबले होते. दुपारी २ वाजता भरती सुरु झाल्यावर किल्ल्यात गेलेल्या एकुण आठ पर्यटकांनी या भरतीतून किनाऱ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या आठ जणांना भरतीच्या पाण्यातून जावू नका, तूम्हाला समुद्राच्या भरतीचा अंदाज येणार नाही, रिस्क घेवू नका,असं या किल्ल्यात कार्यरत पूरातत्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी विनंतीपूर्वक सांगितलं. आठ जणांपैकी पाच जणांनी पवार यांची विनंती मान्य करुन ते किल्ल्यातच थांबले. परंतू सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा या तिघांनी आपली विनंती ऐकली नाही, आणि ते भरतीच्या पाण्यातून किनाऱ्याकडे गेले, अशी माहिती पूरातत्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी दिली. सुरेश स्वामी हा सुदैवाने पोहत किनाऱ्यांवर पोहचला. तो किनाऱ्यावर आल्यानंतर सौरभ खान व वृषभ सिव्हा बुडाल्याची माहिती समजली आणि पोलिसांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरु झाली.

त्या पाच जणांनी ऐकलं आणि ते बचावलेकिल्ल्यातून निघालेल्या आठ पैकी पाच जणांनी आपली विनंती मान्य केली. ते किल्ल्यातच थांबले, आणि सुदैवाने बचावले याचे समाधान पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान या पाच जणांना लाईफ गार्डच्या बोटीने किनाऱ्यांवर सुखरुप नेण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.