ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 12 - कपडे शिवल्याचे पैसे मागितल्यामुळे रागाला जावून मधूकर मारूती डांगे (रा. कासेगाव, ता. पंढरपूर) याने सुधाकर महादेव कलुबर्मे (वय ४५, रा. कासेगाव) यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना मंगळवारी (१२ जुलै) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आज श्रीसंत ज्ञानेश्वर व श्रीसंत तुकाराम महाराज या मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांनी तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केल्यामुळे पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा ताण आहे. यातच ही घटना घडल्याने तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांची धावपळ सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.