खेट्री/मळसूर (जि. अकोला): दुचाकीवर पेटलेले झाड पडल्याने एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी मळसूर ते चान्नी रोडवर घडली. या अपघातात सचिन मोकाराम चव्हाण (२३, रा. पहाडसिंगी) हा युवक ठार झाला. अपघातात नारायण मनोहर ताले (रा. सायवणी) हे जखमी झाले. सचिन चव्हाण व नारायण ताले हे एमएच-३0-एआर-९९१७ या क्रमांकाच्या दुचाकीने सायवणी परिसरा तील शिवारात एका विहिरीवर काम करण्यासाठी जात होते. मळसूरजवळ एक निंबाचे जळत असलेले झाड दुचाकीवर कोसळल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले; मात्र चव्हाणचा मृत्यू झाला. ताले यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या हाताला दुखापत झाली. अपघातात दुचाकीने नुकसान झाले.
दुचाकीवर पेटलेले झाड पडल्याने एक ठार
By admin | Updated: May 3, 2016 02:14 IST