शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीकडे जाणारा वारकऱ्यांचा ट्रक उलटून नाशिकचा एक ठार : ४५ जखमी

By admin | Updated: July 8, 2016 17:28 IST

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील जेऊरजवळ गुरुवारी (दि़७) मध्यरात्री उलटला़ यामध्ये नाशिकचे वारकरी मोतीराम शिंदे(आभाळाची वाडी) यांचा जागीच मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. ८ : पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांचा ट्रक सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील जेऊरजवळ गुरुवारी (दि़७) मध्यरात्री उलटला़ यामध्ये नाशिकचे वारकरी मोतीराम शिंदे(आभाळाची वाडी) यांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ४५ वारकरी जखमी झाले आहेत़ नाशिकजवळील गंगापूर गावच्या दिंडीतील हे सर्व वारकरी असून यातील किसन शिंदे (गंगापूर गाव, नाशिक) यांची प्रकृती गंभीर आहे़ दरम्यान, जखमींवर सोलापूर जिल्ह्यातील कोरेगाव तसेच अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

नाशिकजवळील गंगापूर गावातून दरवर्षी पंढरपूरसाठी दिंडी जाते़ गंगापूर गावातील ११ नंबरच्या या दिंडीत सुमारे ४५ वारकरी सामील झाले होते़ करमाळ्याजवळून विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे सर्वजण ट्रकमध्ये गेले होते़ पंढरपूरहून परतत असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ट्रक उलटला़ यामध्ये मोतीराम शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर किसन शिंदे हे गंभीर जखमी झाले आहे़ ट्रकमधील वारकऱ्यांपैकी सुमारे १८ वारकऱ्यांच्या हाता-पायाला फॅक्चर झाले असून उर्वरित किरकोळ जखमी झाले आहेत़ या जखमी वारकऱ्यांपैकी २५ वारकऱ्यांवर सोलापूर जिल्ह्यातील कोरेगाव येथे तर १५ वारकऱ्यांवर अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले़ अहदमनगर रुग्णालयातील जखमींना नाशिकला हलविण्यात आले असून कोरेगाव येथील जखमींनाही लवकरच नाशिकला हलविण्यात येणार आहे़ दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेले मोतीराम शिंदे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नाशिकला पाठविण्यात आला आहे़