शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

बसच्या अपघातात १ ठार ४0 जखमी

By admin | Updated: October 4, 2016 01:58 IST

मोताळा व नांदुरा तालुक्यात घडले दोन अपघात; सेवानवृत्त मुख्याधापकाचा अपघाती मृत्यू.

बुलडाणा, दि. ३- मोताळा व नांदुरा येथे घडलेल्या एस. टी. बसच्या दोन अपघातात १ जण ठार तर ४0 जण जखमी झाले. नांदुरा तालुक्यात एसटी बसचे स्टेअरींगवरील संतुलन बिघडल्यामुळे बस उलटून झालेल्या अपघातात ४0 प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवारी ११.३0 चे दरम्यान नांदुरा शहरापासून ८ कि.मी. अंतरावर घडली. मलकापूर आगाराची जिगाव-नांदुरा (क्र.एमएच ४0-एन ८२२९) ही बस जिगाव येथून ११ वाजता प्रवासी घेऊन निघाली होती. बस राष्ट्रीय महामार्गावर येताच नांदुरानजीक बसचे स्टेअरींग फ्री झाल्याने चालक पी.एम. कोलते यांचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या खाली जावून गड्डय़ा त पलटी झाली. नांदुर्‍याचा सोमवारी आठवडी बाजारचा दिवस असल्याने बसमध्ये यावेळी ५८ ते ६0 प्रवासी होते. या अपघातात ४0 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी ३१ जणांवर नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर उर्वरित जखमींनी आपल्या सोयीप्रमाणे खासगी दवाखान्यात उपचार केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात उ पचार केल्यानंतर काही जखमींना खामगाव येथे हलविण्यात आले. दुसर्‍या घटनेत बसखाली आल्याने सेवानवृत्त मुख्याध्यापक ठार झाले. ही घटना मोताळा बस स्थानकावर घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या धडकेने मागच्या चाकात येऊन कोथळी येथील सेवानवृत्त मुख्याध्यापक मनोहर ओंकारदास राठी (वय ७२) हे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मोताळा बस स्थानकावर ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ : ३0 वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनुसार कोथळी येथील मनोहर ओंकारदास राठी हे सोमवारी दीड वाजेच्या सुमारास बुलडाणा येथून मोताळा बसस्थानकावर उतरून घराकडे जात होते. दरम्यान, माहुरगडहून जळगाव खांदेशकडे जाणारी बस क्र. एम.एच.२0 बी.एल.३४४७ च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे चालवून मनोहर राठी यांना पाठीमागून जबर धडक दिली. या धडकेत मनोहर राठी गंभीर जखमी झाले. त्यांना ता तडीने येथील डॉ. महाजन यांच्या दवाखान्यात नेण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू ंझाला. मनोहर राठी हे कोथळी येथील जनता हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले व आप्त परिवार आहे. याप्रकरणी गणेशकुमार राठी यांच्या तक्रारीवरून बस चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.