शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एक प्रभारी गेले अन् दुसरे प्रभारी आले; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकपदी डॉ. अजय चंदनवाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 07:58 IST

वैद्यकीय शिक्षण विभागाला शुक्रवारी हसन मुश्रीफ यांच्या रूपाने नवीन मंत्री मिळाले असून, त्याच्या कार्यकाळात तरी वैद्यकीय शिक्षण विभागाला पूर्णवेळ संचालक पद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संताेष आंधळेमुंबई : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकपदी पुन्हा एकदा प्रभारी संचालक म्हणून सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्ती करण्यात आली. या पदावर नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसकर गेली दोन वर्ष प्रभारी संचालक होते. चार वर्षांपासून हे पद एमपीएससीमार्फत भरून पूर्ण वेळ संचालकाची नियुक्ती करणे अपेक्षित असताना या पदाची जाहिरात काढून हे पद का भरले जात नाही यावर जोरदार चर्चा आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागात एकदा संचालकपद एमपीएससीमार्फत तर एकदा प्रमोशनने भरले जाते. डॉ. वासुदेव तायडे हे एमपीएससी होते. त्यानंतर २०११ मध्ये हे पद प्रमोशनने डॉ. प्रवीण शिनगारे यांना मिळाले. २०१९ मध्ये त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद एमपीएससीमार्फत भरणे गरजेचे होते.  मात्र सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांना या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. अवघ्या सहा ते सात दिवसांत डॉ. वाकोडे यांनी सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांना अतिरिक्त कार्यभार दिला. डॉ. लहाने यांच्या सेवानिवृत्तीनंतर २०२१ जुलैमध्ये नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसकर यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यांच्याकडून शुक्रवारी हा कार्यभार सहसंचालक डॉ अजय चंदनवाले यांना देण्यात आला. डॉ. म्हैसकर यांना नांदेड वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता पदावर पाठविण्यात आले.  

या पदाची एमपीएसीकडून जाहिरात दिली तर राज्यभरातून या पदासाठी पात्रताधारक कुणीही अर्ज करू शकेल. एखाद्या महत्त्वाच्या पदाचा काही वेळ अतिरिक्त कार्यभार देणे हे तात्पुरती व्यवस्था असते. मात्र संचालक पद वर्षानुवर्षे अतिरिक्त कार्यभारावर चालवण्या मागचा हेतू स्पष्ट हाेत नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाला शुक्रवारी हसन मुश्रीफ यांच्या रूपाने नवीन मंत्री मिळाले असून, त्याच्या कार्यकाळात तरी वैद्यकीय शिक्षण विभागाला पूर्णवेळ संचालक पद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

डॉ. अजय चंदनवाले यांनी मोठा काळ शासकीय सेवेत गेला असून, १९९२ पासून ते ऑर्थोपेडिक विभागात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी विभागप्रमुख, ९ वर्ष अधिष्ठाता पद आणि ४ वर्ष सहसंचालक पदावर काम केले आहे. शुक्रवारी त्यांनी संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.