शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

एकीकडे तिरंगा यात्रा अन् दुसरीकडे राष्ट्रध्वज उभारणीला विरोध

By admin | Updated: August 18, 2016 18:30 IST

वर्धेतील भाजप आमदार व नगरसेवक वर्धेची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेल्या ४० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वाजाला विरोध करतात

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 18 : एकीकडे खासदार जिल्ह्यात तिरंगा संवाद यात्रा काढून शहीदांचे जिल्हावासीयांना स्मरण करुन देत आहे, तर दुसरीकडे वर्धेतील भाजप आमदार व नगरसेवक वर्धेची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेल्या ४० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वाजाला विरोध करतात. इतकेच नव्हे, तर नगर पालिकेचा १० कोटी रुपयांचा हक्काचा निधीही आमदार महोदयांनी परस्पर वळता केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवारी येथील सदभावना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

एकूणच राष्ट्रध्वजाची भव्य उभारणी आणि पालिकेच्या वळता केलेल्या निधीवरुन वर्धेतील राजकारणात नवा रंग भरला आहे.चंद्रशेखर खडसे म्हणाले, वर्धा ही महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. या  शहरातील प्रताप नगरातील इंदिरा गांधी उद्यानात २४ तास फडकत राहणारा तब्बल ४० मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात यावा,ही बाब वर्धेसाठी गौरवास्पद ठरणार, असा प्रस्ताव नगरसेवक प्रफुल्ल शर्मा यांनी नगर पालिकेच्या १५ जून २०१५ रोजी सर्वसाधारण सभेत ठेवला होता. त्यावेळी तो मंजूरही झाला. या राष्ट्रध्वजासाठी सुरुवातीपासूनच भाजपच्या नगरसेवकांचा विरोध होता, असा आरोप खडसे यांनी केला.

राष्ट्रध्वज उभारणीसाठी सुमारे २५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित होता. पालिकेची आर्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे निधीची अडचण पुढे आली. राज्य शासनाने उद्याने व क्रिडांगण निर्मितीच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्णचा ४ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. यामध्ये १० टक्के पालिकेचा सहभाग आवश्यकहोता. या अनुषंगाने पालिकेची सभा झाली. त्यात सर्व १० ही प्रभागातील उद्याने विकसित करण्यासाठी सभागृहाने कामनिहाय अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.

यामध्ये ४० मीटरचा राष्ट्रध्वज उभारणीसाठी २५ लाखांची आणि उद्यानाच्या उर्वरित कामांसाठी १० लाख, अशी ३५ लाखांची तरतूद करण्यात आली. हे सोपस्कार पार पाडल्यानंतर तांत्रिक अहवालासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे प्रस्ताव पाठविला. अहवाल प्राप्त झाला. यासाठी ५ लाख ९ हजार रुपये शुल्कही जमा करण्यात आले. दरम्यान, २५ जुलै २०१६ रोजी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वैशिष्टपूर्ण/विशेष रस्ता/नगर पंचायत योजनेंतर्गत वर्धा नगर परिषद व सेलू नगर पंचायतीला वितरीत केलेल्या निधीअंतर्गत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सुचविलेली कामे घेण्यात यावी, असे आदेश दिले गेले. यापद्धतीने सुमारे १० कोटींचा पालिकेचा निधी परस्पर वळता केला गेला.

परिणामी वर्धेत २४ तास सन्मानाने फडकत राहणाऱ्या राष्ट्रध्वाजाच्या उभारणीला खीळ बसली, असा गंभीर आरोपही खडसे यांच्यासह नगरसेवक प्रफुल्ल शर्मा व अन्य नगरसेवकांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला काँग्रेसचे गटनेता सोहनसिंग ठाकूर, सुशील धोपटे, शिलाताई गुजर, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी सुनील कोल्हे, माजी नगरसेवक निलेश खोंड, मनीष गंगमवार यांची उपस्थिती होती.