लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) साठी ३० ऑक्टोबरपर्यंत ८६ लाख ३ हजार अर्ज परिवहन विभागाकडे आले आहेत. त्यापैकी ६८ लाख २४ हजार वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आली आहे. आता उर्वरित सुमारे एक कोटी १३ लाख वाहनधारकांना एका महिन्यात एचएसआरपी बसवावी लागणार आहे.
२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे दोन कोटी वाहनांवर एचएसआरपी बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कामासाठी आरटीओ कार्यालयांसाठी तीन झोनमध्ये तीन वेगवेगळ्या संस्थांची नेमणूक केली आहे. वाहनांवर एचएसआरपी बसवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. या तारखेनंतर ऑर्डर करणाऱ्या तसेच एचएसआरपी नसलेल्या वाहनांना दंड करण्यात येणार असल्याचे अधिकारी म्हणाले.
एचएसआरपीची किंमत वाहनाचे प्रकार आणि नंबर प्लेटच्या आकारानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. नंबरप्लेटसाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्याचे शुल्क जीएसटीसह ऑनलाइनच भरावे लागते.
झोन कोणते?
झोन १ : बोरिवली, ठाणे, पनवेल, पुणे, कोल्हापूरसह १२ आरटीओझोन २ :मुंबई सेंट्रल, कल्याण, पेण, रत्नागिरी, सातारा, आदी १६ आरटीओझोन ३ : वडाळा, वाशी, सिंधुदुर्ग, नाशिक, सांगली, कऱ्हाडसह २७ आरटीओ
Web Summary : 86 lakh HSRP applications received; 68 lakh plates fitted. 1.13 crore vehicles must install HSRP by November 2025 to avoid fines. Zones assigned for installation.
Web Summary : 86 लाख एचएसआरपी आवेदन प्राप्त; 68 लाख प्लेटें लगीं। जुर्माने से बचने के लिए 1.13 करोड़ वाहनों को नवंबर 2025 तक एचएसआरपी लगानी होगी। स्थापना के लिए क्षेत्र आवंटित।